Last Updated on 29 Nov 2021 5:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली ।
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे.अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत कृषी कायदे मागे घेण्यासंदर्भातील विधेयक सादर करण्यात आले होते.लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले. दोन्ही सभागृहांमध्ये हे विधेयक मंजूर झाल्यानंतर ते राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येईल.राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतरच तिनही कृषी कायदे घटनात्मकरित्या रद्द होतील.
आवाजी मतदानाने प्रस्ताव मंजूर
केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा प्रस्ताव मांडला.विरोधकांच्या गोंधळातच हा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ही विधेयके रद्द करण्यात आली.विरोधकांच्या गदारोळातच हे विधेयक मंजूर करण्यात आले.या विधेयकार कुठलीही चर्चा न होताच ते मंजूर झाले. हे विधेयक लोकसभेत मांडताच काही मिनिटांत ते मंजूर झाले. यावेळी लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी विधेयकावर चर्चेची मागणी केली होती.










































































