Last Updated on 14 Oct 2025 7:24 PM by Sanjay Patil/Adhorekhit
माजी नगरसेवक कॅप्टन इंद्रजीत गुजर, माजी विरोधी पक्षनेत्या स्मिता हुलवान, युवा नेते श्री. संजय कांबळे आदींचा भाजप प्रवेश
मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात आमदार डॉ. अतुल भोसले यांचे नेतृत्व स्वीकारत प्रवेश
मुंबई । भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईत कराड मधील अनेक मान्यवरांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष राजेंद्र (आप्पा) माने, माजी नगरसेवक कॅप्टन इंद्रजीत गुजर, माजी विरोधी पक्षनेत्या स्मिता हुलवान, युवा नेते श्री. संजय कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात ‘कराड दक्षिण’चे आमदार डॉ. अतुल भोसले यांचे नेतृत्व स्वीकारत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसमधून भाजपत आलेल्या सर्वांचे स्वागत केले. आमदार डॉ. अतुल भोसले, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आ. डॉ. अतुल भोसले म्हणाले, कराड नगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. कराड शहराचा विकास व्हावा, अनेक प्रलंबित प्रश्न सुटावेत. त्याला महायुती सरकारच्या माध्यमातून बळ मिळावे म्हणून आज शहरातील अनेक मान्यवरांनी प्रवेश केला. सर्वाना बरोबर घेऊन विकासकामे करण्याचा आमचा प्रयत्न राहील. येत्या काळात आणखी पक्षप्रवेश निश्चितपणाने होतील.










































































