Last Updated on 21 Mar 2025 12:35 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती
मुंबई : पुणे शहरात प्रत्येक मेडिकलदुकानामध्ये एकच औषध वेगवेगळ्या कंपनीची उपलब्ध असून विविध मेडिकल दुकानात वेगवेगळ्या दराने मिळत असल्याबाबत तक्रार प्राप्त नाही. मात्र अशी तफावत आढळून आल्यास त्याची चौकशी करुन कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य श्रीमती उमा खापरे यांनी यासंदर्भातील प्रश्न विचारला होता. सदस्य श्री.प्रवीण दरेकर यांनी याअनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.
अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री. झिरवाळ म्हणाले, केंद्र शासनाच्या औषध किंमत नियंत्रण आदेश, 2013 अन्वये औषधांच्या किंमती नियंत्रित केल्या जातात. एमआरपी पेक्षा अधिक किंमतीत कुणीही औषध विक्री करू शकत नाही. त्यांना मिळणाऱ्या कमिशनमधून ते दर कमी जास्त करू शकतात. खाजगी रुग्णालयात जेनेरिक औषध दुकान सुरू करण्याबाबत निश्चित विचार केला जाईल, असे सांगून डॉक्टरांना जेनेरिक किंवा इतर ब्रँडचे औषध याबाबत स्पष्ट उल्लेख करण्याच्या सूचना दिल्या जातील, असेही मंत्री श्री.झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 24 Jan 2026 5:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit सातारा । शेकडो किलोमीटर लांब येऊन पोटासाठी राबणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षणात मदत करण्यासाठी कृष्णा कारखान्याने मायेच... Read more















































































