Last Updated on 05 Dec 2021 7:15 AM by Sanjay Patil/Adhorekhit
कोलकाता ।
दोन दिवसांच्या सस्पेन्सनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मोठा निर्णय घेतला आहे.ओमिक्रॉनचा धोका असतानाही भारतीय क्रिकेट संघाला या महिन्याच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेला जाण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) 90 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोलकाता येथे पार पडली.
टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर फक्त तीन कसोटी (3 tests) आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. वेळापत्रकानुसार भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारे चार टी-20 सामने (T-20 Match) तुर्तास स्थगित करण्यात आले आहेत.
बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा, 2021-22, सुधारित तारखा आणि मार्गक्रमणासह पुढे जाईल.26 डिसेंबर 2021 पासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत संघ सहभागी होणार आहे.
मुळात हा दौरा 17 डिसेंबरपासून सुरू होणार होता.या दौऱ्यात चार T20I सामील आहेत,जे आता नंतरच्या तारखेला खेळले जातील.














































































