Last Updated on 04 Dec 2021 5:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit
बहेचे ओंकार मोहिते झाले युवासेना नवी मुंबईचे शाखा अधिकारी
मुंबई ।
वाळवा तालुक्यातील बहे येथील ओंकार सुनिल मोहिते यांची शिवसेनेच्या युवासेना शाखा अधिकारीपदी निवड झाली आहे.त्यांच्या निवडीचे पत्र नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी त्यांना दिले आहे.
आदरणीय पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे व युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे,पालकमंत्री एकनाथ शिंदे,ठाणे जिल्हा तसेच सह संपर्क प्रमुख ठाणे,खासदार राजन विचारे यांच्या सुचनेनुसार आपले शिवसेना पक्षातील आतापर्यंतचे कार्य पाहता आपल्यावर युवासेना शाखा अधिकारी या पदाची जबाबदारी देत आहोत.आपण भविष्यामध्ये पक्षाच्या वरीष्ठांकडून येणारे आदेश,सूचना,पक्षाची धोरणे आणि पक्ष शिस्तीचे पालन करून पक्ष बांधणीसाठी व विविध सामाजिक कार्यक्रमांसाठी सक्रिय राहून जास्तीत जास्त पक्षकार्यासाठी वेळ द्यावा असे पत्रात म्हटले आहे.

ओंकार मोहिते यांचे अभिनंदन करताना पलूस कडेगाव मतदार संघातील काँग्रेसचे युवा नेते जितेश कदम व दिग्विजय कदम आदी
पलूस कडेगाव मतदार संघातील काँग्रेसचे युवा नेते जितेश कदम व दिग्विजय कदम यांनी मोहिते यांचे अभिनंदन केले आहे.त्याचबरोबर महाडिक युवाशक्ती मुंबई व नवी मुंबई व आम्ही सांगलीकर आणि माथाडी कुस्ती सेवा संघाने ओंकार मोहिते यांचे अभिनंदन केले आहे.मुंबईच्या वसंतराज क्रेडिट को-ऑप सोसायटीचे जनरल मॅनेजर सुनिल मोहिते यांचे ओंकार मोहीते हे चिरंजीव आहेत.शाखा अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.











































































