Last Updated on 24 Jan 2025 6:45 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । राज्य परिवहन महामंडळाच्या तोटा भरुन काढण्यासाठी एसटीच्या तिकिट दरात १४.९७ टक्के वाढ करण्याचा निर्णय महामंडळानं घेतला आहे. ही दरवाढ आजपासून लागू झाल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिली.
एसटी सोबतच येत्या १ फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीची तीन रुपये प्रतिमीटर भाडेवाढ होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
वाढलेली महागाई आणि वाढते इंधनदर यामुळे एसटीला दरदिवशी सुमारे ३ कोटी रुपयांचा आर्थिक तोटा म्हणजेच महिन्याला ९० कोटींचा तोटा सहन करावा लागतो, यातून मार्ग काढण्यासाठी ही भाडेवाढ करण्यात आल्याचं ते म्हणाले. चांगल्या सोयी-सुविधा प्रवाशांना मिळाव्यात, यासाठी प्रत्येक वर्षी भाडेवाढ करणं अपेक्षित असतं मात्र, मागील काही वर्षांपासून ही भाडेवाढ करण्यात आलेली नाही, असं ते म्हणाले.
एसटीच्या भाडेवाढीचा कोणताही परिणाम जुन्या योजनांवर होणार नाही, महिलांसाठींची ५० टक्केंची सूट कायम राहणार आहे, असं सरनाईक यांनी सांगितलं.
Courtesy: Prasar Bharati











































































