Last Updated on 28 Jun 2020 7:18 PM by
रांची : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी आता शेतकरी बनला आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे क्रिकेट स्पर्धा ठप्प झाल्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आपल्या कुटुंबासोबत रांची येथील फार्महाऊसवर वेळ घालवत आहे.
महेंद्र सिंग धोनी याने आपल्या फेसबूक पेजवरून एक व्हिडिओ पोस्ट करून दिली आहे.बुधवारी आपल्या फेसबूक खात्यावर धोनीने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.ज्यात तो जैविक शेतीची सुरूवात करताना दिसत आहे. या व्हिडिओ सोबत धोनीने लिहिले आहे, रांचीमध्ये २० दिवसामध्ये टरबूज आणि पपईची ऑर्गेनिक शेतीची सुरूवात केली आहे.

व्हिडिओमध्ये माही शेतीला सुरूवात करताना विधीवत पूजा करताना दिसत आहे.या दरम्यान त्याने नारळही फोडले आहे.यानंतर धोनी काही व्यक्तींसोबत पेरणी करण्यास सुरूवात केली आहे.दरम्यान, व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये सीएसकेचा कर्णधार ट्रॅक्टरच्या मदतीने जमीन कसताना दिसत आहे. धोनीला ट्रॅक्टरची सवारी आवडलेली आहे असे दिसून येते.
जगभरात कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे इंडियन प्रीमिअर लीग अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्यावर पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा सोबत धोनी रांची येथील आपल्या फार्महाऊसवर पोहचला आणि लॉकडाऊन पासून तो तेथे स्थायिक आहे. या दरम्यान, धोनीच्या पत्नी साक्षीने भारतीय कर्णधाराचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.दरम्यान, 7 जुलै रोजी धोनी आपल्या 39 वा वाढदिवस साजरा करणार आहे.टीम इंडियाचा माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचे ‘बाईक’ प्रेम कुणापासून लपलेले नाही. रांची येथील त्याच्या फार्महाऊसमध्ये दुचाकींनी भरलेले गॅरेज आहे.














































































