Last Updated on 27 Oct 2021 2:47 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता राज्य सीईटी कक्षाकडून घेण्यात आलेली MHT-CET-2021 ऑनलाईन प्रवेश परीक्षेचा निकाल आज सायंकाळी 7 वाजता उमेदवारांच्या लॉगीनमधून https://mhtcet2021.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. भौतिकशास्त्र रसायनशास्त्र, गणित म्हणजे पीसीएम आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र अर्थात PCB या दोन्ही विषयांसाच्या ग्रुपचे निकाल प्रसिद्ध केले.
MHT CET निकाल कसा पाहायचा?
स्टेप 1: महाराष्ट्र CET च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
स्टेप 2: होम पेजवर तुम्हाला MHT CET स्कोअर कार्डची लिंक मिळेल.
स्टेप 3 : नवीन पेज उघडेल. येथे दिलेल्या जागेत तुमचा रोल नंबर आणि पासवर्ड (जन्मतारीख) यासारखी आवश्यक माहिती भरून लॉग-इन करा.
स्टेप 4: तुम्ही लॉग इन करताच तुमचा निकाल आणि स्कोअर कार्ड स्क्रीनवर पाहायला मिळेल.
राज्यातून पाच लाख पाच हजार ७८८ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यामध्ये पीसीएम ग्रुपसाठी दोन लाख २८ हजार ४८६; तर पीसीबी ग्रुपसाठी दोन लाख ७७ हजार ३४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. २० सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती.











































































