Last Updated on 29 Dec 2025 6:45 PM by Sanjay Patil/Adhorekhit
‘विद्यानिकेतन’च्या विद्यार्थ्यांच्या फोक आख्यानास रसिकांनी दिली भरभरून दाद
सांगली । माय भवानी (तान्हाजी),गोंधळ मांडियेला, ललाटी भंडारी आदी मराठमोळ्या गाण्यापासून अगदी युवा पिढीच्या अर्जितसिंगच्या हिंदी गाण्यापर्यंत एकापेक्षा एक सरस गाणी सादर करीत आघाडीचा गायक, ‘धर्मवीर’फेम मनीष राजगिरे,तसेच वैभव वशिष्ठ आणि मंजिरा गांगुली या युवा गायक-गायिकेने कडक्याच्या थंडीतही उरुण ईश्वरपूरच्या कला रसिकांना मंत्रमुग्ध केले.
आविष्कार कल्चरल ग्रुपने कोमल कृष्णा प्रस्तुत “स्वरांजली”या हिंदी मराठी गीतांच्या बहारदार कार्यक्रमाचे येथील खा.एस.डी.पाटील नगरातील विद्यामंदीर हायस्कुलच्या प्रांगणात आयोजन केले होते. हजारो कलारसिकांनी या कार्यक्रमाचा मन मुराद आनंद लुटला. याप्रसंगी उरुण ईश्वरपूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे,आष्टा नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष विशाल शिंदे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. विद्यानिकेतन इंग्लिश मेडीयम स्कुलच्या विद्यार्थी – विद्यार्थिनींच्या फोक आख्यानास रसिकांनी भरभरून दाद दिली.
युवा गायिका मंजिरा गांगुली यांनी जिंदगी और कुछ भी नही,जिया जिया रे,राम चाहे आदी गाण्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर
वैभव वशिष्ठ यांनी केसरिया,हवा हवाई,सुनो रिटा, ओ जाने जाना,झूम बराबर झूम आदी बहारदार गाणी पेश केली. तर मनीष राजगिरे यांनी तान्हाजी चित्रपटातील माय भवानी,गोंधळ मंडियेला, ललाटी भंडारी,छया छया आदी गाणी सादर केली. यावेळी दिलसे रे,बॉम्बेसे आया मेरा दोस्त,देखा तो तुझे यार,मेरा दिल,खैके पान बनारस वाला,तेरा जैसा यार कहा आदी हिंदी -मराठी गाणी सादर करण्यात आली. शेवटी आघाडीच्या गायिका कोमल कृष्णा यांनी लैला मै लैला या बहारदार गाण्याने कार्यक्रमाचा समारोप केला.
उरुण ईश्वरपूर व आष्ट्याच्या नगराध्यक्षांचा जाहीर सत्कार

यावेळी उरुण ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे व आष्ट्याचे नगराध्यक्ष विशाल शिंदे यांचा राजारामबापू सहकारी बँकेचे उपाध्यक्ष माणिक राव पाटील,राजारामबापू दूध संघांचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या हस्ते,तर राजारामबापू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर.डी. माहुली यांच्या हस्ते गायक -गायिकेचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक खंडेराव जाधव,एल.एन.शहा,सुनील मलगुंडे,नगरसेविका पुष्पलता खरात,शुभांगी शेळके,शिवाजी जाधव, जावेद इबुशे,कांचन कोळेकर,मनीषा कुरळपकर, संग्रामदादा पाटील,पीरअली पुणेकर,बाळासाहेब कोळेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.आबासाहेब पवार, राजाराम सॉल्व्हेक्सचे विकास कर्डीले,धनंजय माने यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सभापती डॉ.अशोक पाटील, राजारामबापू दूध संघांचे जनरल मॅनेंजर डॉ.सचिन ढोपे प्रामुख्याने उपस्थित होते. बी.डी.पवार,सुस्मिता जाधव, सुनिता देशमाने,शैलेश पाटील,रुपाली सपाटे यांच्यासह अनेक मान्यवर व कला रसिक उपस्थित होते.
आविष्कारचे प्रमुख मोहन चव्हाण, अध्यक्ष कृष्णा मंडले, कार्याध्यक्ष भूषण शहा, उपाध्यक्ष राजेंद्र माळी, सचिव विजय लाड, सहसचिव विनायक नायकल, खजिनदार विश्वास कदम, तसेच माजी कार्याध्यक्ष नजीर शेख, डॉ.अतुल मोरे, माजी अध्यक्ष सतिश पाटील, सचिनकाका पाटील, प्रा. प्रदीप पाटील, संतोष पाटील, राजवर्धन लाड, धनंजय भोसले, बी.आर.पाटील, प्रशांत पाटील, हर्षवर्धन घोरपडे, सौरभ सावंत, अक्षय जाधव, अजय थोरात, अनिल पाटील, विश्वजित पाटील, अक्षय पाटील, धनाजी देशमुख, सूरज कचरे, प्रताप कवठेकर, सचिन शिंगटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.












































































