Last Updated on 26 Jan 2022 2:52 PM by Sanjay Patil/Adhorekhit
दिल्ली |
भारतात आज ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. यंदाचा प्रजासत्ताक दिन विशेष असा असणार आहे.कोरोनाच्या नियमांचे पालन करुन प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकात जाऊन आदरांजली वाहिली. त्यानंतर ते राजपथावरील कार्यक्रमासाठी दाखल झाले. राजपथावर पथसंचलनामध्ये विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ सादर करण्यात आले. हा दिमाखदार सोहळा सुरू असतानाच मात्र एकाच चर्चा गोष्टीची वारंवार होत होती. ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातलेली टोपी आणि गमछा. पंतप्रधान मोदींच्या या खास पेहरावाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी उत्तराखंडमध्ये वापरत असलेली पारंपारिक टोपी परिधान केली होती.नेताजी सुभाषचंद्र बोस आणि दिवंगत सीडीएस बीपिन रावत हे सुद्धा अशीच टोपी घालत होते. आज मोदींनीही हीच टोपी घातली.देशात पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. विशेषत: सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातही निवडणुका होत आहेत. त्यामुळे मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि रावत घालत असलेली टोपी निवडणुका पाहून घातली का? अशी चर्चा रंगली आहे.
या टोपीवर ब्रह्मकमळ पाहायला मिळत आहे. ब्रह्मकमळ हे उत्तराखंडचे राज्य फूल आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी यांनी गळ्यात मणिपूरमध्ये वापरत असलेला गमछा घातला होता. नरेंद्र मोदी यांनी यंदा पांढऱ्या कुर्त्यावर ग्रे रंगाचं जॅकेट परिधान केले होते.










































































