Last Updated on 28 Sep 2021 4:51 AM by Sanjay Patil/Adhorekhit
लोकशाही आघाडी पॅनेल व विधीसेवा पॅनेल यांच्यात चुरशीने लढत
सांगली : इस्लामपूर येथील इस्लामपूर वकील संघटनेची सन २०२१-२०२२ ची निवडणूक उद्या (२९ सप्टेंबर) होत आहे.या निवडणुकीत लोकशाही आघाडी पॅनेल व विधीसेवा पॅनेल यांच्यात चुरशीने लढत होत आहे.गेल्या ५ वर्षांपासूनची बिनविरोधची परंपरा यावेळी खंडित झाली आहे.
अध्यक्षपदासाठी लोकशाही आघाडी पॅनेलचे ॲड. प्रमोद तात्यासो जाधव व विधीसेवा पॅनेलचे ॲड.शंकर बाबुराव जाधव यांच्यात लढत होत आहे.उपाध्यक्षपदासाठी लोकशाही आघाडी पॅनेलचे ॲड.संदीप पांडूरंग पाटील व विधीसेवा पॅनेलचे ॲड. दिग्वीजय ईश्वर पाटील यांच्यात लढत होत आहे.
सचिव पदासाठी लोकशाही आघाडी पॅनेलचे ॲड.नितीन अशोक पाटील व विधीसेवा पॅनेलचे ॲड.उमेश दिनकर कोळेकर यांच्यात लढत होत आहे.सहसचिव पदासाठी लोकशाही आघाडी पॅनेलचे ॲड. प्रशांत दिलीप जाधव व विधीसेवा पॅनेलचे ॲड.अभिषेक बाबासो देवकर यांच्यात लढत होत आहे.
महिला सहसचिव पदासाठी लोकशाही आघाडी पॅनेलचे ॲड. नंदाताई संजय शिंगटे व विधीसेवा पॅनेलचे ॲड.वर्षाराणी दत्तात्रय पाटील यांच्यात लढत होत आहे.
कार्यकारिणी सदस्य पदासाठी उमेदवार असे :
लोकशाही आघाडी पॅनेल-ॲड.श्रीकांत किरण पाटील,ॲड.अशिष माणिकराव टाकवेकर,ॲड.दत्तात्रय बाळकृष्ण मोहिते,ॲड.अमोल लक्ष्मण मदने,ॲड. टिपूसुलतान दिलावर आत्तार,ॲड.अभयसिंह आनंदराव देसाई
विधीसेवा पॅनेल-ॲड. सुहास विश्वनाथ माळी,ॲड.मयुर अर्जुन पाटील,ॲड.राहुल अशोकराव पाटील,ॲड.वैभव रघुनाथ गायकवाड,ॲड.अनिस आबिद मुल्ला,ॲड.नंदकिशोर जयवंत महाडीक
इस्लामपूर वकील संघटनेच्या कार्यालयात २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ५ यावेळेत मतदान होणार आहे.लोकशाही आघाडी पॅनेलचे कपबशी तर विधीसेवा पॅनेलचे सिंह हे चिन्ह आहे.









































































