Last Updated on 29 Jan 2025 6:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राज्य सरकारच्या १५ टक्के एसटी भाडेवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आक्रमक पवित्रा घेत इस्लामपूर बस स्थानकासमोर तीव्र निदर्शने आणि भाडे वाढीचा जाहीर निषेध करण्यात आला. ही एस.टी.भाडेवाढ मागे घ्या,अन्यथा तीव्र आंदोलन करू,असा इशारा देण्यात आला. यावेळी आगार प्रमुख दिलीप ठोंबरे यांना निवेदनही देण्यात आले.
वाळवा तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, इस्लामपूर शहराध्यक्ष शहाजी पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने, युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, कार्याध्यक्ष देवराज देशमुख, महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात, युवक शहराध्यक्ष दिग्विजय पाटील यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी भाडेवाढ व सरकार विरोधा तील घोषणांनी परिसर दणाणून गेला.
तालुकाध्यक्ष विजयराव पाटील म्हणाले, सरकार विधानसभा निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्याऐवजी सामान्य माणसा ला भुर्दंड करीत आहे. सामान्य माणसाच्या एसटीवरच भाडे वाढ कशी? जिल्ह्यात खून- दरोडे,अंमली पदार्थ विक्रीचा हैदोस चालू असताना त्याकडे शासनाचे लक्ष आहे का?
शहाजीबापू पाटील,सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढ नसताना अचानक एसटी दरवाढ का? एका बाजूला महिलांना ५० टक्के मोफत प्रवास द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला १५ टक्के दरवाढ करण्याचा सरकारचा डाव आहे. सध्याच्या महागाईत ही दरवाढ अन्यायकारक आहे.
सुस्मिता जाधव म्हणाल्या,राज्य सरकार कर्नाटकप्रमाणे महिलाना मोफत एसटी प्रवास देणार होते. त्याउलट त्यांनी एसटी भाडेवाढ केली आहे. त्यांना एसटीचे खाजगीकरण करायचे आहे.
सुनिता देशमाने म्हणाल्या,सरकारने लाडक्या बहिणेचे पैसे वाढविले आणि दाजीचा खिसा कापला आहे. यावेळी माजी महिला शहराध्यक्षा रोझा किणीकर,पुष्पलता खरात,संग्राम जाधव,देवराज देशमुख यांचीही भाषणे झाली.
प्रा.शामराव पाटील,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील, माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे, माजी सभापती आनंदराव पाटील, माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर, शंकरराव चव्हाण, डॉ. संग्राम पाटील, सुनिल मलगुंडे, संचालक विठ्ठल पाटील, शैलेश पाटील, राजकुमार कांबळे, डॉ.योजना शिंदे-पाटील, बंडा नांगरे, डॉ.सचिन पाटील, नजरुद्दीन नायकवडी, सचिन कोळी, अभिमन्यु क्षिरसागर, रणजित गायकवाड, शकिल जमादार, स्वरूप मोरे, मोहन भिंगार्डे, मालन वाकळे, शैलजा जाधव, प्रतिभा पाटील, रुपाली सपाटे, मनिषा पेठकर, प्रियांका साळुंखे, नितीन पाटील, विनायक यादव, महेश पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.











































































