Last Updated on 09 Mar 2022 2:59 PM by Sanjay Patil/Adhorekhit
आविष्कार कल्चरल ग्रुपच्या वतीने आयोजन
सांगली ।
आविष्कार कल्चरल ग्रुपच्या वतीने गान कोकिळा,भारतरत्न स्व.लतादीदींना त्यांच्या अजरामर गाण्यातून ‘स्वरमयी श्रद्धांजली’ अर्पण करण्यात आली. ‘स्वराभिषेक’ प्रस्तुत ‘रहे ना रहे हम’ या ‘स्वरमयी श्रद्धांजली’त ख्यातनाम पार्श्वगायक,पद्मश्री पंडीत सुरेश वाडकर यांची शिष्या,इस्लामपूरची सुकन्या राजेश्वरी गायकवाड,प्रसिध्द गायक शेखर गायकवाड (इस्लामपूर),प्रसिद्ध गायक प्रशांत सालियन (कोल्हापूर) यांनी लतादीदींची बहारदार गाणी ‘दृक-श्राव्य’पध्दतीने सादर करून कला रसिकांना मंत्रमुग्ध केले. रेडिओ शुगरच्या निवेदिका सौ.अर्चना थोरात यांनी अभ्यासपूर्ण,प्रभावी शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


राजेश्वरीने मोगरा फुलला या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात केली. लग जा गले,याद किया दिलने,आ जाने जा,कुछ दिलने कहा,न जाने क्यु,दिलकी नजरे से (अनाडी),रैना बिती जाए (अमरप्रेम),ए जिंदगी उसी की है (अनारकली),तुम आ गए,अभी अभी थी दुष्मनी (जखमी),चुनरी संभाल गोरी,ए रात भिगी भिगी,बाहोमे चली आ,मेरे अरमान मेरे सपने,वादा करले साजना, सायोनारा,आणि शेवटी रहे ना रहे हम (ममता) आदी बहारदार गाणी तिने सादर केली. दुहेरी गाण्यात शेखर गायकवाड व प्रशांत सालियन यांनी तिला साथ दिली. रेडिओ शुगरच्या सौ.अर्चना थोरात यांनी ओघवत्या भाषेत कार्यक्रमाचे संचालन केले. गणेश भोसले (सांगली) यांनी ध्वनी व्यवस्था ,तर राजू खरात (इस्लामपूर) यांनी एलईडी व्यवस्था केली.
प्रारंभी स्व.लता दिदीं व लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलन जेष्ठ पंडीत हणमंतबुवा जाधव,बँक ऑफ इंडियाचे मुख्य प्रबंधक श्रीकांत विखे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आविष्कारचे उपाध्यक्ष भुषण शहा म्हणाले,राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांचे मार्गदर्शन व कलारसिकांचे आशिर्वाद ही आमची ताकद आहे. कोरोना च्या खंडानंतर आम्ही नव्या उमेदीने आपल्या समोर येत आहे,पूर्वीसारखीच साथ व सहकार्य करावे.
कलाकारांचा व प्रा.डॉ.सविता देसाई यांचा सन्मान प्रा.शामराव पाटील,महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा रोझा किणीकर, डॉ.एन.टी.घट्टे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आविष्कारचे माजी कार्याध्यक्ष नजीर शेख,माजी अध्यक्ष सतीश पाटील, डॉ.अतुल मोरे,सरपंच बाबुराव पाटील, बालाजी पाटील,खजिनदार राजेंद्र माळी, माजी उपाध्यक्ष राजवर्धन लाड,शैलजा जाधव यांच्यासह कलारसिक या स्वरमयी श्रद्धांजली कार्यक्रमात सहभागी झाले होते.
आविष्कारचे मोहन चव्हाण,अध्यक्ष सुनील चव्हाण,उपाध्यक्ष भूषण शहा,सचिव विश्वनाथ पाटसुते,सहसचिव विजय लाड, लव्हाजी देसाई,धनाजी भोसले,सुनील भोसले,विकास कोरे,अजय थोरात,प्रवीण पाटील,विजय नायकल,आप्पा जावीर,सचिन शिंगटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उर्वरित कार्यक्रम
आविष्कार गेल्या १८ वर्षांपासून दरवर्षी दर्जेदार ३-४ कार्यक्रम देत आला आहे. मात्र कोरोना संकट काळाने यामध्ये खंड पडला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उर्वरित कार्यक्रम दिला जाणार आहे. आविष्कार पुन्हा एकदा नव्या जोमाने कार्यरत झाल्याने रसिकांनी समाधान व्यक्त केले.










































































