Last Updated on 19 Sep 2021 4:07 AM by Sanjay Patil/Adhorekhit

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगची दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आज,19 सप्टेंबरपासून होत आहे.पहिलाच सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात आज होणार आहे.आतापर्यंत 5 वेळा आय़पीएलचं खिताब पटकावलेल्या मुंबई इंडियन्स यंदाही जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल.
मागील टप्प्यामध्ये झालेल्या सामन्यांमध्ये आतापर्यंत दिल्ली पॉईंट्स टेबलमध्ये आघाडीवर आहे तर हैदराबाद तळाला आहे. 4 व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात मैदानात प्रेक्षकांचा आवाज घुमणार आहे. कारण आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात प्रेक्षकांना मैदाना उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या आयोजकांनी याबाबत माहिती दिली.
मुंबई संघाविरुद्ध चेन्नईचा संघर्ष
मुंबई व चेन्नई यांच्यात लीगमध्ये ३१ सामने झाले. रोहितच्या संघाने १९ आणि धोनीच्या संघाने १२ विजय मिळवले. म्हणजे चेन्नईच्या विजयाची सरासरी केवळ ३८ टक्के आहे. आयपीएल २०१३, २०१५ आणि २०१९ च्या अंतिम लढतीत मुंबईने चेन्नईला हरवले होते. मुंबईने चेन्नईविरुद्ध गत १० पैकी ८ सामने जिंकले. पोलार्ड चेन्नईविरुद्ध ४० ची सरासरी आणि १७५ च्या स्ट्राइक रेटने धावा काढतो.दुबईत चेन्नईने 67% सामने जिंकले, मुंबईविरुद्ध विजयाची सरासरी 39%; दुबईमध्ये चेन्नईचे गत 5 सामन्यांत 4 विजय झाला आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स
मुंबईने आतापर्यंत 7 सामने खेळले असून त्यातील केवळ 4 सामनेच जिंकले आहेत. उर्वरीत 3 सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला असून सध्या मुंबईता संघ 8 गुणांसह दिल्ली, चेन्नई आणि आरसीबीनंतर चौथ्या स्थानावर आहे. सध्या शर्मासह सर्व संघ चिंतेत आहे. कारण पहिल्या 7 ही सामन्यात संघ 150 ते 160 च्या दरम्यानच स्कोर उभा करु शकला आहे. तर मुंबई इंडियन्सच्या उर्वरीत 7 सामन्यांचं वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
19 सप्टेंबर (रविवार): मुंबई vs चेन्नई सुपरकिंग्स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई
23 सप्टेंबर (गुरुवार): मुंबई vs केकेआर, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी
26 सप्टेंबर (रविवार): मुंबई vs आरसीबी, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई
28 सप्टेंबर (गुरुवार): मुंबई vs पंजाब किंग्स, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी
02 ऑक्टोबर (शनिवार): मुंबई vs दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3:30 वाजता, शारजाह
05 ऑक्टोबर (मंगळवार): मुंबई vs राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह
08 ऑक्टोबर (शुक्रवार): मुंबई vs सनरायजर्स हैद्राबाद, दुपारी 3:30 वाजता, अबू धाबी














































































