Last Updated on 24 Oct 2021 6:48 AM by Sanjay Patil/Adhorekhit
केळी हे असे फळ सगळ्यांच्या पसंतीचे आहे. मात्र, काही वेळा ते खाण टाळल जाते. त्यावेळी केळीचे हेल्दी मिल्कशेक बनवून पिणे हे सोपे आणि आरोग्यासही गुणकारी आहे हे असे कोल्ड ड्रिंक आहे जे लहानांपासून मोठे कोणालाही आवडू शकते.स्वादिष्ट लागणारे हे मिल्कशेक पौष्टिक आहेच तसेच ते स्वादिष्ट सुद्धा आहे. तसेच बनाना मिल्कशेक तायर होण्यास फारसा कालावधी लागत नाही, ते झटपट तयार होतो. तर जाणून घेण्यात बनाना मिल्कशेक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
1 कप दूध, 1/4 कप क्रीम, 1 कप कापलेले केळं आणि अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स, अर्धा कप क्रश केलेला बर्फ
कृती
- वरील सर्व साहित्य एकत्र करून ब्लेंडरच्या माध्यमातून स्मूद ब्लेंड करून घ्या.
- मिल्कशेक जसे हवे त्या स्वरूपात ठेवा. घट्ट हवे असल्यास त्यात मिल्क पावडर मिक्स करा.
- त्यानंतर त्यात बर्फ घालून काहीवेळ फ्रिजमध्ये थंड होण्यास ठेवा.
- पौष्टिक बनाना मिल्कशेक तयार करण्यासाठी केवळ 7-8 मिनिटे लागतात.
बनाना मिल्कशेकचे फायदे
- केळात अधिक प्रमाणात फायबर असल्याने दमा, कॅन्सर, उच्च रक्तदाब आणि पचनाच्या कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत.
- यासर्व समस्यांना रोकण्यासाठी नुसते केळं खाणं किंवा बनाना मिल्कशेक करून पिणे फायद्याचे ठरू शकते.
- तसेच लहान मुलांकरता हे मिल्कशेक एक पौष्टिक आणि हेल्दी ड्रिंक म्हणून देता येते.














































































