Last Updated on 02 Nov 2021 6:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अहमदनगर |
अहमदनगरमध्ये साडे तीन लाख रुपये किमतीचा 1300 किलो बनावट खवा जप्त करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई करण्यात आली आहे. गुजरातहून मोठ्या प्रमाणात बनावट खवा खासगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून शहरात येणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बनावट खवा विकला जातो आणि या अशाच खव्यापासून मिठाई बनवली जाते. मात्र, अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केल्याने नागरिक सतर्क झाले आहेत तर मिठाई दुकानदार चांगलेच धास्तावले आहेत.









































































