Last Updated on 10 Nov 2024 3:10 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज मुंबईत राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचं संकल्पपत्र जारी करण्यात आलं. भाजपाच्या संकल्पपत्रात प्रमुख २० मुद्यांवर भर देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र भाजपाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. लाडकी बहीण योजनेची रक्कम पंधराशेवरून एकवीसशे रुपये करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल, भावांतर योजना राबवण्यात येईल, २५ लाख रोजगार निर्मिती करण्यात येईल, वृद्ध योजनेच्या रकमेतही पंधराशेवरुन एकवीसशे रुपये वाढ करण्यात येईल या आश्वासनांचा या संकल्पपत्रात समावेश आहे.
भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन केले गेले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे,खासदार पियुष गोयल,आशिष शेलार यांसह भाजपचे अनेक नेते उपस्थितीत होते.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी भाजपकडून ‘भावांतर योजने’ची घोषणा केली. कापूस सोयाबीनचे भाव पडल्यावर भावांतर योजनेतून पैसे दिले आहेत. एमएसपीशी समन्वय साधत 20 टक्क्यांपर्यंत भावांतर योजन राबविण्यातयेणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
तसंच वीज बिलात ३० टक्के कपात करण्याची आणि सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. युवा वर्गाच्या सक्षमीकरणासाठी विविध पावलं उचलली जाणार आहे. तसंच राज्याला फिनटेक हब बनवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं फडणवीस म्हणाले.
पुढील पाच वर्षांसाठी विविध आश्वासने देण्यात आली आहेत. या संकल्पपत्रात महिला, विद्यार्थी, वृद्ध यांच्यावर भर देण्यात आला आहे. त्यासोबतच यात रोजगार, व्यवसाय यांसह विविध मुद्द्यांवरही पुढील ५ वर्षात भर देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
संकल्पपत्रात या प्रमुख मुद्यांवर भर
👉 शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार
👉 लाडकी बहीण योजनेतील महिलांना १५०० रुपयांवरुन २१०० रुपये दिले जाणार
👉 शेतकऱ्यांची कर्जमाफी भावांतर योजना
👉 प्रत्येक गरीबाला अन्ननिवाऱ्याचे नियोजन
👉 वृद्ध पेन्शन योजनेत दीड हजार वरुन आता २१०० रुपये करणार
👉 २५ लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
👉 विद्या वेतनाच्या माध्यमातून आम्ही अग्रेसर असणार
👉 महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना १० हजार रुपये विद्यावेतन
👉 गरीब मध्यम वर्गीयांना सौर आणि अक्षय योजनेतून वीज बिलातून कमी करण्याचा प्रयत्न करणार
👉 फिनटेक आणि एआयमध्ये सर्वात जास्त रोजगार निर्मिती होणार आणि त्यांचे केंद्र महाराष्ट्र असेल
👉 एरोनांनिक्स आणि स्पेसमध्ये उत्पादनाची संधी
👉 शेतकऱ्यांसाठी मूल्यसाखळी बनवण्याचा प्रयत्न
👉 २०२७ पर्यंत ५० लाख लखपती दीदी तयार करण्याचा प्रयत्न
👉 महारथी मार्फत मोठ्या लॅब तयार करण्याचा प्रयत्न करणार
👉 महाराष्ट्रात कौशल्य जनगणना करणार
👉 १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा प्रयत्न असेल
👉 युवात फिटनेस असला पाहिजे त्यासाठी स्वामी विवेकानंद फिटनेस कार्ड तयार करणार
👉 गडकिल्लांसाठी प्राधिकरण तयार करणार
👉 ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा धोरण करणार
👉 वीज बिलात ३० टक्के कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार
👉 शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतांवरील जीएसटी अनुदानाच्या रुपात परत देणार












































































