Last Updated on 17 Jul 2023 5:58 PM by Sanjay Patil/Adhorekhit
गटविकास अधिकारी डॉ.आबासाहेब पवार यांची माहिती
सांगली । सदयस्थितीला वातावरणातील बदल,अवेळी होणारा पाऊस,तापमानात होणारी वाढ,वातावराणातील धोकादायक वायू/प्रदुषण यामुळे ग्लोबल वॉर्मीगचा धोका वाढला आहे.त्यावर उपाययोजनेचा भाग म्हणून वाळवा पंचायत समितीकडून तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या माध्यमातून 33 हजार रोपांची लागवड लागवड करणार आहे.
सदयस्थितीला वातावरणातील बदल,अवेळी होणारा पाऊस,तापमानात होणारी वाढ,वातावराणातील धोकादायक वायू/प्रदुषण यामुळे ग्लोबल वॉर्मीगचा धोका वाढला आहे.ग्रीनहाऊस वायूमुळे ओझोनचा थर कमी होऊन तापमान वाढ होत आहे.त्यावर उपाययोजनेचा भाग म्हणून वाळवा पंचायत समितीकडून वृक्ष लागवड,अपारंपारीक उर्जेचा वापर करण्याबाबत मोठया प्रमाणात प्रचार प्रसिध्दी करण्यात येत आहे त्यामध्ये शाळा व इतर सार्वजनीक ठिकाणी सौर पंप बसविण्याचे काम सुरु आहे.
बायोगॅसच्या वापरामुळे मिथेन वायूचे उर्त्सजन कमी होऊन स्वयपाकासाठी गॅस निर्मिती होते.यासाठी वाळवा तालुक्यातील ग्रामपंचायतीकडून तालुक्यातील शेतक-यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून बायोगॅस यंत्राची मागणी करावी असे आवाहन देखील गटविकास अधिकारी डॉ.आबासाहेब पवार यांनी केले आहे.
वाळवा तालुक्यात वाळवा पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून ग्रामपंचायतींच्या माध्यमातून सन 2022-23 मध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना बिहार पॅटर्न अंतर्गत गतवर्षी 12 हजार व चालूवर्षी 4 हजार असे एकूण 16 हजार वृक्ष लागवड करण्यात आली.त्याचे संगोपन व संरक्षण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.तसेच सामाजिक वनीकरण विभागामार्फत वन महोत्सव सन 2023-24 अंतर्गत तालुक्यातील ग्रामपंचायीना 17 हजार 270 रोपे उपलब्ध करुन दिलेली आहेत.पंचायत समिती वाळवा व ग्रामपंचायतींच्या माध्यमातून 33 हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे.
यामध्ये आंबा,आवळा,सागवान,लिंब,सिताफळ,वड,पिंपळ,करंज यांचा समावेश आहे.वाळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात हा उपक्रम सुरू आहे.तसेच प्रत्येक गावातील विविध सामाजिक संघटना आणि सहकारी संस्था तसेच शेतकरी,विद्यार्थी यांनी या उपक्रमास सहकार्य करण्याचे आवाहन गटविकास अधिकारी डॉ. पवार यांनी केले आहे.








































































