Last Updated on 16 Jun 2023 9:13 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । लोकांची दिशाभूल,फसवणूक करणाऱ्या वास्तु तज्ञांचा, वास्तुविशारदांचा फोलपणा आणि दहशत मोडून काढली पाहिजे.प्रा.डॉ नितीन शिंदे यांच्या ‘वास्तुशात्र..एक चिंतन ‘ या पुस्तकातून व्यापक प्रबोधन होईल,असे मत ज्येष्ठ अभियंते महेश मोरे यांनी व्यक्त केले.
इस्लामपूर येथील वाळवा तालुका इंजिनियर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रा. शामराव पाटील (अण्णा) होते.प्रा.डॉ.नितीन शिंदे लिखित ‘वास्तुशात्र ..एक चिंतन ‘ या पुस्तकाचे प्रकाशन महेश मोरे यांच्या हस्ते झाले.
इंजिनिअर जयकर खांबे यांनी स्वागत तर मकरंद होरड यांनी प्रास्ताविक केले.पुस्तक लेखकाचा परिचय महा. अं नि स चे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी करून दिला.
प्रा.डॉ.नितीन शिंदे म्हणाले,’ विज्ञानाच्या आणि तर्काच्या कसोटीवर वास्तुशास्त्र ही संकल्पना टिकत नाही.अलीकडच्या काळात बहुसंख्य समाज हा तथाकथित वास्तुतज्ञांच्या,वास्तुविशारद आहारी गेलेले आहे.अभियंते,आर्किटेक्ट पेक्षा या लोकांना जास्त महत्व वाढले आहे.फसवणुकीचे मोठे जाळे वास्तुतज्ज्ञांनी उभे केले आहे. भोंदू वास्तू तज्ज्ञांचा पर्दाफाश या पुस्तकात केला आहे.’
प्रा.शामराव पाटील म्हणाले,अधिकृत शिक्षण घेतलेल्या इंजिनियर्स, आर्किटेक्ट यांचाच सल्ला घेऊन घरे,इमारती बांधल्या पाहिजेत.आधुनिक काळात वास्तू शास्त्रानुसार घर बांधणे ही मोठी अंधश्रध्दा आहे.अशा प्रवृत्ती रोखायला हव्यात.’ वाळवा तालुका इंजिनियर्स असोसिएशन चे अध्यक्ष म्हणाले, ‘सामाजिक कामात सतत अग्रेसर असणारी आमची संघटना आहे,वास्तुशास्त्राच्या फसवणुकी बद्दल आम्हीच या पुस्तकाच्या माध्यमातून प्रबोधन करणार.’
मधुकर ढेरे पाटील यांनी आभार मानले.इंजिनिअर सुनील पाटील यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी क्रेडाई चे उमेश रायगांधी,अमोल पाटील,अरविंद भालेकर,डॉ.राहुल मोरे,प्राचार्य डॉ एस बी माने,प्रा. एल डी पाटील, बी.जी.पाटील उपस्थित होते.












































































