Last Updated on 30 Jun 2025 4:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit
‘रोहयो’ आणि विविध अनुदान थांबवले तर ‘धडकी भरवणारा’ मोर्चा होणार; राष्ट्रवादीचा इशारा
सांगली । वाळवा पंचायत समितीवर जोरदार धडक दिली. सरकारच्या चुकीच्या धोरणांनी गावांचा विकास ठप्प झाला असून शेतकरी राजा हवालदिल आला आहे. राज्य सरकार व प्रशासनाने म.गांधी रोजगार हमी योजना व शेतकऱ्यांच्या विविध अनुदानाचा निधी तातडीने द्यावा,अन्यथा सरकार आणि प्रशासनाच्या उरात धडकी भरेल,असा मोर्चा काढू,असा इशारा प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे,नेर्लेचे सरपंच संजय पाटील, इस्लामपूर शहराध्यक्ष शहाजी पाटील, कामेरीचे सरपंच रणजित पाटील यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
इस्लामपूर येथील तहसिल कचेरी चौकात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून बैल गाड्या व ट्रॅक्टर मोर्चाची सुरुवात झाली. गांधी चौक,संभाजी चौक,आझाद चौक,झरी नाका मार्गे पंचायत समितीमध्ये मोर्चाचे रूपांतर सभेत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधातील घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेले भाजप आ.बबनराव लोणीकर व राज्य सरकारचा प्रमुख पदाधिकऱ्यांनी चांगला समाचार घेतला.

प्रा.वृषाली पाटील (कणेगाव),शंकरराव चव्हाण (सुरूल), हर्षवर्धन पाटील (रेठरे धरण), नागेश कदम (दुधारी), निवृत्ती माळी (कापुसखेड) या सरपंचांसह राजारामबापू दूध संघाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील, युवक तालुका कार्याध्यक्ष देवराज देशमुख, आष्टा शहराध्यक्ष शिवाजी चोरमुले यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणावर झोड उठविली.
हेही वाचा – Koyna Dam : कोयना धरणातील पाणीसाठ्याने गाठले अर्धशतक
या आंदोलनात राजारामबापू बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव, उपाध्यक्ष माणिक पाटील, माजी नगरसेवक खंडेराव जाधव, संचालक शैलेश पाटील, बाजार समितीचे सभापती संदीप पाटील, उपसभापती शिवाजी आटूगडे, आष्टयाचे दिलीपराव वग्याणी, विराज शिंदे, माणिक शेळके, महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने, शहराध्यक्षा पुष्पलता खरात, माजी सभापती शैलजा पाटील, शुभांगी पाटील, युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, शहराध्यक्ष दिग्विजय पाटील, संचालक विठ्ठल पाटील, दिपक पाटील, डॉ.अशोक पाटील, पोपटराव जगताप, शंकरराव पाटील, शंकरराव चव्हाण, बंडा नांगरे, राजेश पाटील, सुभाष भांबुरे, कल्पना गावडे, सुजाता डांगे यांच्यासह गावोगावचे सरपंच,राजारामबापू समूहातील संचालक, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.








































































