Last Updated on 23 Oct 2024 10:26 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राजू शेट्टी यांना अहंकार आलेला पाहायला मिळाला. शेतकरी चळवळीसाठी अनेकांनी बलिदान दिलेलं आहे, रक्त सांडलेलं आहे. राजू शेट्टी सारख्या दीड शहाण्याची मला काही गरज नाही, असा पलटवार रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ. सदाभाऊ खोत यांनी केला.
‘सदाभाऊ खोत परिवर्तन महाशक्ती आघाडीत आले तरी त्यांना घेणार नाही, आमच्या आघाडीत स्वच्छ हात, स्वच्छ चारित्र्याची लोकं पाहिजेत मी जास्त काही बोलत नाही’, असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली होती.
आ. खोत म्हणाले, राजू शेट्टी यांना अहंकार आलेला पाहायला मिळाला. शेतकरी चळवळीसाठी अनेकांनी बलिदान दिलेलं आहे, रक्त सांडलेलं आहे. राजू शेट्टी सारख्या दीड शहाण्याची मला काही गरज नाही, त्यांना फार मोठा अहंकार आलेला आहे दररोज काशीला जाऊन आंघोळ करत आहे असा त्यांचा समज झालेला आहे, हातकलंगले लोकसभा मतदार संघातील जनतेने त्यांना डोक्यावर घेतलं, खांद्यावर घेतलं आणि पायाखाली घेऊन तुडवलं, आणि त्यांचं डिपॉझिट ही जप्त झालेलं पाहायला मिळालं हे जनतेने दिलेलं उत्तर आहे मला काही त्यांना उत्तर देण्याची गरज नाही…
गोपीचंद पडळकर याना उमेदवारी मिळाली पाहिजे…
ते म्हणाले, बहुजन समाजाचा तळागाळाचा माणसाचा एक चेहरा म्हणून आज गोपीचंद पडळकर बघितलं जातं. परंतु काही प्रस्थापित घराणे त्यांच्या उमेदवारीला विरोध करताना पहात आहे जत सारख्या दुष्काळ भागांमध्ये जीवाचं रान करून या माणसाने पिण्याच्या पाण्याच्या योजना आणल्या जत शहराला पाण्याची योजना आणली तेथील तरुणांना हाताला काम मिळण्यासाठी एमआयडीसी मंजूरसुद्धा केली.हजारो युवकांना हाताला रोजगार मिळणार आहे. आणि पोटाची खळगी भरण्यासाठी देशभर धावणारा दुष्काळ भागातील माझा तरुण स्थिरस्थावर होईल अशा पद्धतीने त्या पद्धतीने असा काम करत आहे लढण्यासाठी विधानसभेचे तिकीट गोपीचंद पडळकर यांना दिली पाहिजे.








































































