Last Updated on 12 Feb 2023 10:19 AM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली ।
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून राजीनाम्यावर अखेर मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे.महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
2019 मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी यांची 2019 मध्ये महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.याआधी कोश्यारी हे नैनितालचे खासदारही राहिले आहेत.महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी रविशंकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना महाराष्ट्राचे नवे राज्यपाल बनवण्यात आले.
कोश्यारी 2001 मध्ये मुख्यमंत्री
कोश्यारी यांचा जन्म 17 जून 1942 रोजी उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यातील चेताबागड गावात झाला.त्यांनी आपले प्रारंभिक शिक्षण अल्मोडा येथे पूर्ण केले आणि त्यानंतर आग्रा विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात आचार्य ही पदवी प्राप्त केली.
नोव्हेंबर 2000 मध्ये उत्तराखंड देशाचे 27 वे राज्य बनले होते.नित्यानंद स्वामी यांच्या सरकारमध्ये कोश्यारी यांना ऊर्जा मंत्री करण्यात आले होते,जे त्यावेळी पहिले मुख्यमंत्री होते.त्यानंतर, ऑक्टोबर 2001 मध्ये,भाजप हायकमांडने स्वामींचे उत्तराधिकारी म्हणून कोश्यारी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली.कोश्यारी हे केवळ पाच महिने मुख्यमंत्री होते.2002 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करून काँग्रेस सत्तेवर आली.
त्यानंतर 2002 ते 2007 पर्यंत ते उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेतेही होते. 2008 ते 2014 पर्यंत ते उत्तराखंडमधून राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून आले.भगतसिंग कोश्यारी हे आरएसएसच्या खूप जवळचे होते.
कोण आहेत रमेश बैस?
रमेश बैस झारखंडचे 2001 पासून राज्यपाल आहेत. 2019 ते 2021 या कालावधीत ते त्रिपुराचे राज्यपाल होते.
1999 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते पर्यावरण आणि वनखात्याचे मंत्री होते.
बैस यांचा जन्म रायपूरचा.भारतीय जनता पक्षाचे नेते असलेल्या बैस यांचं शालेय शिक्षण भोपाळ येथे झाले.
1978 मध्ये ते रायपूरच्या नगरपालिकेत निवडून आले.1980 मध्ये झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत बैस यांनी काँग्रेसच्या सत्यनारायण शर्मा यांचा पराभव करत बाजी मारली.
1989 मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले.रायपूर मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती.त्यानंतर सलग 6 वेळा याच मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून येत गेले.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये पोलाद,खाणी,खते, माहिती आणि प्रसारण खात्याचीही धुरा सांभाळली.
1989 आणि 1996-2019 या कार्यकाळात ते रायपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यापालांची नियुक्ती केली आहे. त्यात महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती केली आहे.
१३ राज्यपाल बदलले
रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र
लेफ्टिनेंट जनरल कैवल्य त्रिविक्रम, राज्यपाल, अरुणाचल प्रदेश
लक्ष्मण प्रसाद आचार्य, राज्यपाल, सिक्किम
सीपी राधाकृष्णनन, राज्यपाल, झारखंड
शिव प्रताप शुक्ला, राज्यपाल, हिमाचल प्रदेश
गुलाबचंद कटारिया, राज्यपाल, आसम
निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर, राज्यपाल, आंध्र प्रदेश
बिस्वा भूषण हरिचंदन, राज्यपाल, छत्तीसगढ़
अनुसुईया उइके, राज्यपाल, मणिपूर
एल. गणेशन, राज्यपाल, नागालँड
फागू चौहान, राज्यपाल, मेघालय
राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, राज्यपाल, बिहार
ब्रिगेडियर (रिटायर्ड) बीडी मिश्रा, उपराज्यपाल, लडाख












































































