Last Updated on 24 Oct 2024 8:47 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी जत तालुक्यातील गावभेट दौऱ्यादरम्यान उंटवाडी येथे गावातील पारावर आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासमवेत गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. पारावरच्या गप्पात त्यांनी महायुती सरकारने घेतलेले अनेक लोकहिताचे निर्णय लोकांपुढे मांडले.
आ. खोत हे बुधवारी जत तालुक्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासमवेत विविध गावांना भेटी देत तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला.

जत तालुक्यातील गावभेट दौऱ्यादरम्यान उंटवाडी येथे गावातील पारावर आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासमवेत गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी महायुती सरकारने घेतलेले अनेक लोकहिताचे निर्णय लोकांपुढे मांडले.त्यावर जमलेल्या लोकांकडून महायुतीने घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयांचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले. यावेळी चंद्रशेखर गोब्बी, संजय तेली, आकाराम दादा मासाळ, सोमन्ना हाके, रमेश बिराजदार, सरदार पाटील, लिंबाजी माळी, सरपंच लक्ष्मण जखगोंड, सरपंच महादेव हिंगमिरे, सरपंच सुरेश पाटील, प्रमोद हिरवे, भाऊसाहेब दुधाळ, अनिल पाटील तसेच सर्व मान्यवर, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
हेही वाचा – राजू शेट्टींसारख्या दीड शहाण्याची मला काही गरज नाही; आ. सदाभाऊ खोत यांचा पलटवार

जत तालुक्यातील गावभेट रवलगुंडवाडी दौऱ्यादरम्यान येथे त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासमवेत गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी महायुती सरकारने घेतलेले अनेक लोकहिताचे निर्णय लोकांपुढे मांडले. त्यावर जमलेल्या लोकांकडून महायुतीने घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयांचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले. यावेळी चंद्रशेखर गोब्बी, संजय तेली, आकाराम दादा मासाळ, सोमन्ना हाके, रमेश बिराजदार, सरदार पाटील, लिंबाजी माळी, सरपंच लक्ष्मण जखगोंड, सरपंच महादेव हिंगमिरे, सरपंच सुरेश पाटील, प्रमोद हिरवे, भाऊसाहेब दुधाळ, अनिल पाटील तसेच सर्व मान्यवर, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
बिळूर येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासमवेत ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी महायुती सरकारने घेतलेले अनेक लोकहिताचे निर्णय लोकांपुढे मांडले. त्यावर जमलेल्या लोकांकडून महायुतीने घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयांचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले ; यावेळी सोबत चंद्रशेखर गोब्बी, संजय तेली, आकाराम दादा मासाळ, झे.पी.काका, फारुख जमादार, सोमन्ना हाके, रमेश बिराजदार, सरदार पाटील, लिंबाजी माळी, सरपंच लक्ष्मण जखगोंड, सरपंच महादेव हिंगमिरे, सरपंच सुरेश पाटील, प्रमोद हिरवे, भाऊसाहेब दुधाळ, अनिल पाटील तसेच सर्व मान्यवर, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

त्याचबरोबर पाच्छापूर, मेंढेगिरी, अमृतवाडी, बिळूर, येळदरी, रवलगुंडवाडी आदी गावांना भेटी देत त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासमवेत गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला.यावेळी त्यांच्या समवेत माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार पाटील, रयत क्रांतीचे किरण उथळे आदी होते.









































































