Last Updated on 05 Nov 2023 7:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कृषी क्षेत्रामध्ये शेतक-यांच्या उत्पन्नात साखर उद्योगाचा सिंहाचा वाटा असतो. साखर उत्पन्नाबाबत 33 टक्के उत्पादनासह जगात ब्राझील प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ भारत 16 टक्के , चीन 9 टक्के , थायलंड 6 टक्के , मेक्सिको 4 टक्के तर, इतर देशांतील साखर उत्पन्नाचे एकत्रित प्रमाण 32 टक्के इतके आहे. देशात साखर उत्पादनाच्या क्षेत्रात महाराष्ट्राचा सर्वांत मोठा (35 टक्के ) वाटा आहे. गेल्या 50 वर्षांत महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रांतर्गत साखर उद्योगाने कृषी अर्थकारणात मोठी मजल मारली आहे.
27 सप्टेंबर 2021
महाराष्ट्र:
S/30 साखरेचा व्यापार 3330 ते 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3400 ते 3500 रुपये प्रति क्विंटल राहिला.
कर्नाटक:
S/30 साखरेचा व्यापार 3390 ते 3500 रूपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3450 ते 3475 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश:
M/30 चा व्यापार 3700 ते 3720 रुपये होता.
गुजरात:
S/30 चा व्यापार 3361 से 3441 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3501 ते 3531 रुपये होता.
तामिळनाडू :
S/30 चा व्यापार 3525 ते 3650 रुपये होता. M/30 चा व्यापार 3585 ते 3700 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)












































































