Last Updated on 08 Oct 2023 10:37 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अधोरेखित ऑनलाइन डेस्क । एकोळीकार प्रा.डॉ.संजय थोरात यांच्या हजारो वाचकांच्या चेहऱ्यावर दररोज स्मित हास्य फुलवणाऱ्या ‘एकोळी’ च्या (डिजिटल पुस्तकाचे) 6 व्या भागाचे प्रकाशन करण्यात आले.
एकोळीची पाच डिजिटल पुस्तके प्रकाशित प्रकाशित करणारे प्रकाशक प्रा.अमृत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘एकोळी’ च्या 6 व्या भागाचे आज प्रकाशन करण्यात आले.
प्रा.डॉ.संजय थोरात यांच्या ‘एकोळी’ या साहित्य प्रकाराला वाचकांचा उदंड प्रतिसाद आहे.एकोळी ही इंग्रजी one liners ची आपली भाषा व संस्कृती सापेक्ष भाषांतरे होत.सरावामुळे कमीत कमी शब्दात विनोद,उपरोध, दंभस्फोट ठासून भरलेले लेखन आहे.एकोळी हे स्मितहास्य फुलवणार हास्यभाषित होय.एकोळी हसता हसता विचारात गुंतवते.स्वतःकडे आणि समाजाकडे हलक्या फुलक्या नजरेने पाहायला शिकवते.
हसा एका ओळीत या मराठी पुस्तकानंतर,प्रकाशक प्रा.अमृत पाटील यांनी एकोळीची पाच डिजिटल पुस्तके प्रकाशित केली.विनोदी मंच व हास्यांगण या विनोदाला वाहिलेल्या फेसबुक वरील ग्रुपवर आपल्या एकोळी सातत्याने टॉप टेन मध्ये आहेत.
हजारो वाचकांच्या चेहऱ्यावर दररोज स्मित हास्य फुलवणाऱ्या एकोळी अनुभवण्यासाठी आपण माझा 9850248286 हा नंबर save करा आणि hii म्हणा असे आवाहन एकोळीकार प्रा.डॉ.संजय थोरात यांनी केले आहे.














































































