Last Updated on 08 Nov 2022 1:52 PM by Sanjay Patil/Adhorekhit
निशिकांत भोसले-पाटील (दादा) बनले वाहतूक नियंत्रक; एका तासाने झाली वाहतूक सुरळीत
सांगली । उरुण- इस्लामपुर शहरातील वहातुक पोलिस विभागातील पोलिस कर्मचारी शोधा आणि एक हजार रुपये मिळवा म्हणण्याची वेळ शहरवासीय व प्रवाशी वर्गावर आली असताना कामेरी नाका येथील वहातुक कोंडी पाहुन उरुण – इस्लामपुर नगरपरीषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी स्वत: गाडीतुन उतरुन वहातुक कोंडी सुरळीत केली.
रविवारी सायं.६:३० ते ७:०० यावेळी ही वहातुक कोंडी निर्माण झाली होती.अर्धा तासाने वहातुक कोंडी सुरळीत झाल्याने अनेक प्रवाशांनी श्वास सोडला व निशिकांत भोसले-पाटील यांचे आभार मानले.गेल्या अनेक महिण्यापासुन वहातुक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला असुन पोलिस यंत्रणा सुस्त आहे.शहरातील सिंग्नल व्यवस्थेचे बारा वाजल्याने वहातुकदार व प्रवाश्यांना नाहक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.त्याचबरोबर बहुमुल्य वेळ ही गमवावा लागत असल्याने प्रशासन व पोलीसांबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
शहरात चव्हाण कार्नर,कामेरी नाका,आष्टा नाका या शहरात प्रवेश करण्याच्या ठिकाणी ट्राॅफीक सिग्नल बसविण्यात आली होती,शहरासाठी वहातुक नियंत्रण पोलिस विभाग ही कार्यरत आहे,मात्र वरील तिन्ही ठिकाणचे सिग्नल गेल्या अनेक महीण्यापासुन बंद अवस्थेत आहेत.तर वहातुक नियंत्रण पोलिस विभाग व या विभागात काम करणारी कर्मचारी शोधण्याची वेळ शहरवासीय व प्रवाश्यांच्यावर आली आली आहे.सक्षम पोलीस अधिकारी व सक्षम वहातुक नियंत्रण विभाग नसल्याने वर्दीतील माणुस वहातुक कोंडी च्या ठिकाणी दिसुन येत नाही.तर ट्राॅफीस सिग्नल चे नगरपालिका प्रशासनाची अवस्था चिखलात रुतलेल्या रेड्यासारखी झाल्याने सिंग्नल पाॅईट हे नगरपालिकेला अर्थिक भार ठरले आहेत.नगरपालिका व पोलिस अधिकारी आपली जबाबदारी सोयीस्कररित्या झटकत असताना दिसत आहेत. नागरीकांच्या प्रश्नला व समस्येला आश्वासने किंवा केराची टोपली दाखविण्यात दोन्ही विभागाचे अधिकारी चतुर बनले आहेत,नगरपालिकेवर प्रशासक असल्याने या अधिकार्यांच्यावर कोणाचा वचक राहीलेला नाही.हम करसो कायदा असा मनमानी कारभाराच्या दाढेत जनता अडकली असल्याचे चित्र आहे.
या सर्व परिस्थीतीची गंभीर दखल घेऊन उरुण – इस्लामपुर नगरपरीषदेचे माजी नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत- भोसले पाटील (दादा) यांनी प्रशासनाच्या नियोजन शुन्य कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख डाॅ.बसवराज तेली यांच्याकडे वहातुक नियंत्रण कक्ष व ट्राॅफीक सिग्नल यंत्रणा तात्काळ सक्षम करुन सहा वहातुक नियंत्रण विभागासाठी पोलिस कर्मचारी व आठ होम गार्ड नियुक्त करणेबाबत विनंती करणार असल्याचे सांगितले.
दोघे गावाला तर दोघे पंढरपुरात
यावेळी निशिकांत भोसले पाटील यांनी वहातुक नियंत्रण कक्षातील पोलिस कर्मचारी यांच्याशी संपर्क साधला असता दोघे शहरात इतरत्र तर दोघे पंढरपुरला बंदोबस्तासाठी असल्याचे समजले. वहातुक नियंत्रण कक्षातील दोन कर्मचारी शहरासाठी पुरेशे आहेत का ? मग वरीष्ठ अधिकारी काय करतात असा प्रश्न निर्माण होत आहे.ट्राॅफीक सिंग्नल हे निशिकांत भोसले- पाटील यांच्या नगराध्यक्ष फंडातुन बसविण्यात आलेले आहेत.सुरुवातील ही यंत्रणा सुरळीत सुरु होती,यामुळे वहातुक कोंडीवरील ताण कमी झाला होता,मात्र लोकप्रतिनिधीचा कार्यकाळ संपला आणि प्रशासक आले आणि शहरातील प्रश्न व समस्या त भर पडु लागली.प्रश्न व समस्यांचा निपटारा कमी पण कारणे जास्त अशी भुमीका प्रशासकाची शहरवासी अनुभवत आहेत.ट्राॅफीक सिग्नल सुध्दा नगरपालिका प्रशासका च्या आडमुडेपणामुळे बंद आहेत.दोन दिवसात ट्राॅफीक सिंग्नल सुरु होऊन वहातुक कोंडीवर नियंत्रण नाही आले तर भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते ट्राॅफीक सिंग्नल दुरुस्त करुन वहातुक कोंडीवर नियंत्रण आणतील याची सर्व जबाबदारी नगरपालिका प्रशासक व पोलिसांची राहील असा इशारा निशिकांत भोसले-पाटील यांनी दिली.













































































