Last Updated on 20 Mar 2025 6:58 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राजारामबापू ज्ञान प्रबोधिनी येथे ‘जयंत करिअर गाईडन्स सेंटर’च्या वतीने आयोजन
सांगली : इयत्ता १० वी,१२ वी हा प्रत्येक विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहे. १० वी,१२ वीनंतर विद्यार्थी-विद्यार्थिनीं ना कोण-कोणत्या संधी आहेत? ते आपल्या भवितव्यासाठी कोणत्या क्षेत्राची निवड करू शकतात? याचे योग्य व अचूक मार्गदर्शन “जयंत करिअर गाईडन्स सेंटर”च्या वतीने इस्लामपूर येथील राजारामबापू ज्ञान प्रबोधिनी येथे सोमवार दि.२४ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता केले जाणार आहे. या मोफत कार्यशाळेचा लाभ घ्यावा,असे आवाहन कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राचार्य आर.डी.सावंत यांनी केले आहे.
माजी मंत्री आ.जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जयंत करिअर गाईडन्स सेंटर गेल्या १० वर्षापासून इयत्ता १० वी,१२ वीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी,पालक व शिक्षकांना करिअरबाबत योग्य व अचूक मार्गदर्शन करीत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून शास्त्रीय पध्दतीने मानसिक क्षमता कसोटीच्या सहाय्याने (कल चाचणी) विद्यार्थ्यांची क्षमता, अभि योग्यता,अभिरुची,बुध्यांक, भावनांक, तसेच समायोजन क्षमता यांचे मूल्यमापन करून पालकांच्या समवेत समुपदेशनाने विद्यार्थ्यांच्या करिअरबाबत सुयोग्य मार्गदर्शन केले जात आहे. या मार्गदर्शनाचा वाळवा, पलूस,शिराळा आदी तालुक्यातील असंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनींना लाभ झालेला आहे.
जयंत करिअर गाईडन्स सेंटरच्या वतीने विद्यार्थी-विद्यार्थीनींची कलचाचणीही केली जाते. राजारामबापू ज्ञान प्रबोधिनी येथे सोमवार दि.३१ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता ही कलचाचणी केली जाणार आहे. इच्छुक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या चाचणीचाही लाभ घ्यावा,असे आवाहन करिअर कौन्सिलर एस.पी.यादव यांनी केले आहे.












































































