Last Updated on 20 Sep 2025 12:43 PM by Sanjay Patil/Adhorekhit
भूमि अभिलेखकडील अर्धन्यायिक प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी लोक अदालतीचे आयोजन
सांगली : जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, सांगली यांच्या न्यायासनाकडे दाखल अर्धन्यायिक प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी शुक्रवार, 26 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सांगली कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, ब्लॉक नं 101 विजयनगर, सांगली येथे लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त पक्षकारांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुरेखा सेठीया यांनी केले आहे.






































































