Last Updated on 30 Mar 2026 10:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर ।
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित मुला-मुलींच्या मानधन कुस्ती स्पर्धेच्या खुल्या गटात जुनेखेडच्या समीर पठाणने भडकंबेच्या शिवरुद्र जंगमवर गुणांनी मात करून प्रथम क्रमांक पटकाविला. या गटात ऋषिकेश कदम महादेववाडी हा तिसरा विजेता ठरला आहे.
सर्व विजेत्यांना राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील, राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव, राजारामबापू सहकारी दूध संघाचे अध्यक्ष संग्राम फडतरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. राजारामबापू कुस्ती केंद्रात गेल्या दोन दिवसापासून ही स्पर्धा मोठया उत्साहात पार पडली. या स्पर्धेतील चटकदार कुस्त्यांनी कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
स्पर्धेचा निकाल –
९७ किलो गट – प्रथम- रोहन पाटील सुरुल, द्वितीय – यशराज पाटील औंढी, तृतीय – शंतनू ताटे ईश्वरपूर,
९२ किलो गट – प्रथम – शिवकरण पाटील डोंगरवाडी, द्वितीय – मनिष पवार मसूचीवाडी, तृतीय -प्रथमेश कदम रेठरे धरण
८६ किलो गट – प्रथम – सुनिल बंडगर सुरुल, द्वितीय – आशिष शिंगाडे ईश्वरपूर, तृतीय – सिद्धार्थ पाटील राजारामबापू कुस्ती केंद्र,
७९ किलो गट – प्रथम – रितेश गावडे वाटेगांव, द्वितीय – रोहित कोळेकर सुरुल, तृतीय – स्वरूप गावडे नेर्ले
७४ किलो गट – प्रथम -सिद्धार्थ पाटील सुरुल, द्वितीय -प्रणव भोसले पेठ, तृतीय -ऋषिकेश मोहिते महादेववाडी
७० किलो गट – प्रथम -तेजस पाटील सुरुल, द्वितीय – प्रतिक पाटील सुरुल, तृतीय – सुमित किल्लेदार भाटवडे
६५ किलो गट – प्रथम -सतिश सूर्यवंशी काळमवाडी,द्वितीय -दिगंबर पाटील अंत्री,तृतीय -गणेश कोळेकर सुरुल,
६१ किलो गट – प्रथम -ऋतुराज साळुंखे ताकारी,द्वितीय -हरीश खरात खरातवाडी,तृतीय-ओम कदम औंढी,
५७ किलो गट – प्रथम -ओम जाधव भाटवडे,द्वितीय – सुमित सुतार सुरुल, तृतीय -तेजस शिंदे येडेनिपाणी,
५० किलो गट- प्रथम – सम्राट पाटील सुरुल, द्वितीय – धैर्यशील पाटील साखराळे, तृतीय – सुजल जाधव औंढी,
४५ किलो गट- प्रथम – शुभम मासाळ कसबे डिग्रज, द्वितीय – विनायक जाधव येडेनिपाणी, तृतीय – वैभवराजे माने येडेनिपाणी,
४० किलो गट- प्रथम – स्वरूप ढेकळे नेर्ले, द्वितीय -राजवीर घाडगे येडेनिपाणी, तृतीय – राजवीर झेंडे काळमवाडी
मुली
७२ किलो गट – प्रथम – वैष्णवी सावंत काळमवाडी, द्वितीय – श्रेया शिंदे बोरगाव,
६१ किलो गट – प्रथम – श्रावणी सावंत काळमवाडी, द्वितीय – तेजस्विनी जाधव नागराळे,
५५ किलो गट – प्रथम – श्रद्धा सावंत काळमवाडी, द्वितीय – तनया सावंत काळमवाडी,
५० किलो गट – प्रथम – तनुष्का देवकर भाटवडे, द्वितीय – रितिका सावंत कवठेपिरान,
४५ किलो गट – प्रथम – शिवानी वडिगे कवठेपिरान, द्वितीय – वैष्णवी सावंत काळमवाडी, तृतीय -श्रीशा साठे नेर्ले,
४० किलो गट – प्रथम – श्रावणी भालेराव बोरगाव, द्वितीय – जानवी झेंडे काळमवाडी,
३५ किलो गट – प्रथम – स्वराली पाटील कवठेपिरान, द्वितीय – ज्ञानेश्वरी माळी कासेगाव.
हणमंत जाधव पुणदी, विनायक पाटील बोरगाव, अनिल बाबर रेठरे हरणाक्ष, संदीप पाटील वारणानगर, जयदीप पाटील माले, सुहास पाटील कवलापूर, धनंजय महाडिक नेर्ले यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली. ईश्वरा पाटील येलूर यांनी स्पर्धेचे सुंदर स्मालोचन केले.
प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना मल्लांना रोख रक्कम,सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र बक्षीस देण्यात आले. तसेच प्रत्येक गटातील पहिल्या विजेता मल्लास रुपये २ हजारापासून रुपये ५ हजारापर्यंत मासिक मानधन आणि प्रतिदिन एक लिटर दूध दिले जाणार आहे.
याप्रसंगी सौ.छाया पाटील,संचालक कार्तिक पाटील, प्रा.डॉ.योजना शिंदे पाटील, पै.भगवान पाटील, नगरसेवक स्वरूप मोरे, राजकुमार कांबळे, हणमंत माळी, दिलीपराव पाटील, बंडा नांगरे, पै.अशोक मोरे, कार्यकारी संचालक विजय मोरे, सचिव डी.एम. पाटील, कुस्ती प्रशिक्षक कुंडलिक गायकवाड, नितीन सलगर यांच्यासह परिसरातील मान्यवर व कुस्ती शौकीन उपस्थित होते.












































































