Last Updated on 13 Apr 2022 10:16 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई |
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी राज्य सरकारने खूशखबर दिली आहे. विविध विभागातील रिक्त पदांच्या भरतीला अर्थ विभागाने मान्यता दिली आहे.याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
असे आहे शासन निर्णयात…
ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या 11 फेब्रुवारी 2016 च्या शासन निर्णयनुसार सुधारित आकृतीबंध मंजूर केला, त्या सुधारित आकृतीबंधातील एमपीएससीच्या कक्षेतील पदे वगळता 50 टक्के पदे भरता येतील.
ज्या प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहे, अशा सुधारित आकृतीबंधातील एमपीएससीच्या कक्षेतील 100 टक्के पदांची भरती करण्यास परवानगी
कोविडच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांतर्गत 4 मे 2020 चे निर्णय लागू झाल्यानंतरच्या कालावधीत उच्चस्तरीय समितीने आणि उपसमितीने मान्यता दिलेली एमपीएससीच्या कक्षेतील 100 टक्के पदे भरण्यास मान्यता असेल.
जारी केलेला शासन निर्णय


राज्यात विविध शासकीय विभागात २ लाख पदे रिक्त
राज्यात विविध शासकीय विभागांसाठी एकूण ११ लाख ५३ हजार ४२ पदे मंजूर असून त्यातील ८ लाख ७७ हजार ४० पदे भरलेली आहेत तर २ लाख ३ हजार ३०३ पदे रिक्त आहेत.राज्यात कोविड प्रादुर्भावाच्या दोन वर्षांच्या काळात पदांची भरती होऊ शकली नाही, मात्र आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठवून भरती प्रक्रियेला गती दिली आहे.दरम्यान,एमपीएससीला नुकतेच राज्य सरकारच्या विविध विभागात गट-अ, गट-ब आणि गट-क च्या तब्बल 6 हजार 356 जागा भरण्याची गरज असल्याचे मागणीपत्र दिले आहे.
एका दृष्टीक्षेपात…
राज्यात विविध शासकीय विभागांसाठी एकूण ११ लाख ५३ हजार ४२ पदे मंजूर
त्यातील ८ लाख ७७ हजार ४० पदे भरलेली,तर २ लाख ३ हजार ३०३ पदे रिक्त
ओबीसी, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गाचा मिळून १५ हजार ४२६ पदांचा अनुशेष
गृह,आरोग्य आदी विभागांची भरती प्रक्रिया ताबडतोब राबवली












































































