Last Updated on 12 May 2022 3:55 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राज्य सेवा पूर्व परीक्षा 21 ऑगस्ट दिवशी
एमपीएससी कडून राज्य सेवा पूर्व परीक्षा तारीख जाहीर करण्यात आली आहे. यंदाची एमपीएससी प्रिलिम्स परीक्षा (Rajyaseva Prelims Exam 2022) 21 ऑगस्ट 2022 दिवशी होणार आहे. ही परीक्षा 161 जागांवर नोकरभरती साठी होणार आहे. काही दिवसांपूर्वीच विक्रमी वेळेत एमपीएससीने निकाल जाहीर केला होता त्यानंतर आता आगामी परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. एमपीएससीने याबाबतचं सविस्तर नोटिफिकेशन अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले आहे.
यंदा राज्यात 37 केंद्रांवर ही राज्य सेवा पूर्व परीक्षा होणार असून याद्वारा वित्त आणि लेखा सेवा गट अ सहाय्यक संचालक, नगरपालिका- नगरपरिषद मुख्याधिकारी गट अ, राज्य उत्पादन शुल्क विभाग गट ब या आणि बालविकास विभागाच्या पदांची नोकरभरती केली जाणार आहे.
पदांचा अधिक तपशील खालीलप्रमाणे :
एकूण पदांची संख्या : 161
सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवा : एकूण पदे 09
मुख्याधिकारी, नगरपालिका/नगरपरिषद : 22 पदे
बाल विकास प्रकल्प अधिकारी : 28 पदे
सहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क : 02 पदे
उप अधीक्षक, राज्य उत्पादन शु्ल्क : 03 पदे
कक्ष अधिकारी : 05 पदे
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी : 04 पदे
निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था व अन्य : 88 पदे
शैक्षणिक पात्रता :
1) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, (गट अ) – किमान 55% गुणांसह B.Com किंवा CA/ICWA किंवा MBA
2) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (गट ब) – B Sc (भौतिकशास्त्र व गणित विषयासह) किंवा पदवी (अभियांत्रिकी)
3) उर्वरित सर्व पदे – पदवीधर किंवा समतुल्य पात्रता
वयोमर्यादा :- दि 01 सप्टेंबर 2022 रोजी 19 ते 38 वर्षे, (मागासवर्गीय / अनाथ / EWS 05 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- अमागास प्रवर्ग 544/-, मागासवर्गीय/EWS/अनाथ 344/-
शारिरीक पात्रता :- (काही पदाकरिता)













































































