Last Updated on 28 Mar 2026 9:33 AM by Sanjay Patil/Adhorekhit
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे सर्वाधिक काळ नेतृत्व करणाऱ्या नेत्यांमध्ये स्व. यशवंतराव मोहिते यांचे नाव पुढे येते. सलग पाच वेळा कराड दक्षिणचे नेतृत्व केलेल्या यशवंतराव मोहिते यांचे विधानसभेतील कामकाज आणि वक्तृत्वाने त्यांची ओळख महाराष्ट्राचे ज्येष्ठ विचारवंत म्हणून आजही आहे. याच विचारवंताच्या तिसरे पिढीतील हे युवा नेतृत्व. म्हणजे डॉ अतुल भोसले होत. या नव्या नेतृत्वाने तब्बल पन्नास वर्षानंतर आपल्या घराण्याचा आवाज पुन्हा महाराष्ट्र विधानसभेत दणाणून सोडला.
महाराष्ट्रातील पहिल्यांदाच विजयी झालेल्या आमदारांमध्ये डॉ. अतुलबाबा भोसले यांची कारकीर्द विधानसभेत सध्या ठळक अक्षराने नोंद होत आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूकनंतर नागपूर व मुंबई येथे दोन ते तीन अधिवेशने पार पडली. या प्रत्येक अधिवेशनात डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विकास कामाच्या बाबतीत आवाज उठवून विधानसभा दणाणून सोडली. डॉ अतुल भोसले सत्ताधारी असूनही विधानसभेत सर्वसामान्य शेतकरी व लोकोपयोगी कामाचे प्रश्न विधानसभेत मांडले. याच प्रश्नाची चर्चा सध्या मतदारसंघात चर्चिली जात आहे.
वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या विद्युत बीलाचे प्रश्नासाठी योजना सोलर फिडरवर आणण्याचे काम असो किंवा कराडचे शिवाजी स्टेडियमचा प्रश्न असो शेतकऱ्यांचे जीवन मरणाचा प्रश्न असलेल्या प्रश्नावर पोटतिडकीने बोलत सहकारी पाणी योजनांच्या अस्तित्वाचा प्रश्न असे शेतकऱ्यांच्या व कष्टकऱ्यांच्या जीवनाशी निगडित प्रश्न विधानसभेत मांडून त्याची सोडवणूक करण्याचे काम डॉ. भोसले यांनी प्रामाणिकपणे आपल्या पहिल्याच सत्रात सुरू ठेवले आहे.
अल्पवयात मुख्यमंत्र्यांचे जवळचा माणूस म्हणून महाराष्ट्रात ज्या तरुण आमदाराचे नाव घेतले जाते. त्यामध्ये डॉ. अतुल भोसले यांचे नाव पुढे येते. शॅडो मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख राज्यभर ओळख आहे.
डॉ. अतुल भोसले यांना आपले आजोबा स्वर्गीय जयवंतराव भोसले आणि वडील कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांचे बाळकडू त्यांना मिळाले सहकार महर्षी जयवंतराव भोसले यांनी लहानपणापासूनच डॉ. भोसले यांना राजकीय सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील बाळकडू दिले त्या जोरावर डॉ भोसले यांनी वयाच्या 25 व्या सर्वप्रथम विधानसभेची निवडणूक लढवली. महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश करण्याचे स्वप्न बाळगले .स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी दोन वेळा भल्या मोठ्या राजकीय ताकदीशी लढत दिली .पण थोड्या मतांनी यशाने चकवा दिला. तरीही कोशिश करने वाले की कभी हार नही होती या उक्तीप्रमाणे डॉ. अतुल भोसले यांनी अखेरच्या क्षणापर्यंत हार मानली नाही .पण गत निवडणुकीत राज्याचे व देशाचे दिग्गज नेतृत्व केलेल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री अशा दिग्गज नेत्याचा तब्बल चाळीस हजार मतांनी पराभव करून महाराष्ट्रातील भाजपाचा जॉईंट किलर म्हणून आपली मोहर उमटवली.
स्व. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख लातूरकर यांचा जावई अशी विधानसभेत प्रवेश करताना सर्व पक्षीय आमदारांवर पडलेली छाप आजही विधानसभेत कायम आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे, याशिवाय नेतृत्व आणि कर्तृत्व व कौशल्य असलेले एक युवा आमदार म्हणून आज महाराष्ट्रात त्यांच्याकडे पाहिले जाते आजपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेली कोणतीही जबाबदारी या पठ्ठ्याने कधीही नाकारली नाही. गोवा विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघाच्या प्रचाराची दिलेली धुरा सक्षमपणे पार पाडत त्या विधानसभा मतदारसंघात त्यांनी भाजपला मिळवून दिलेले यश त्यांच्या कर्तुत्वाची पहिली पावती होती. सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षपद कोणाकडे द्यायचे याचा पेच आणि होत नसलेला फैसला यावेळी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून या युवा आमदारावर सातारा जिल्हा भाजपच्या नेतृत्वाची जबाबदारी संकटमोचक जबाबदारी दिली. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत व समिती निवडणुकीत डॉ. भोसले यांनी केलेल्या उठावदार कामगिरीमुळे सातारा जिल्ह्यात भाजपला घवघवीत यश व या यशाला डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाची लागलेली किनार यामुळे तब्बल ६७ वर्षांनी काॅग्रेसचा बालेकिल्ला उध्वस्त झाला व सातारा जिल्ह्यात भाजपचे कमळ फुलले याचे श्रेय डॉ. अतुल भोसले यांना जाते.
कराड तालुका पंचायत समितीत आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच भाजपाला सभापती. व उपसभापती पदाचा मान मिळवून दिला व तालुक्याच्या नेतृत्वाची धुरा आपल्या नेतृत्वाखाली आणली हे यश आज अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे.
जिल्ह्यात पहिल्याच त्यांचे नेतृत्वकाळात भाजपची सत्ता आली व पताका फडकली ही त्यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या कारकीर्दीतील सर्वात मोठी. जमेची गोष्ट आहे. यापुढील काळात डॉ अतुल भोसले यांना भाजपाकडूनअनेक मोठ्या जबाबदाऱ्या येतील त्या जबाबदाऱ्या ते सक्षमपणे ते पार पडतील हीच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
वैभव पाटील, उंडाळे










































































