Last Updated on 30 Jun 2025 2:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेले कोयना धरणात एकूण पाणीसाठा 51.20 टीएमसी (48.65 टक्के) झाला असून कोयना धरणातील पाणीसाठ्याने अर्धशतक गाठले. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आहे. त्यामुळं कोयना धरणात प्रति सेकंद 21,281 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळं जून महिना संपण्याच्या अखेरच्या दिवशी धरणातील पाणीसाठा 51.20 टीएमसी झाला आहे.
कोयना धरणातील पाणीसाठ्यात मुसळधार पावसामुळे झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत कोयनानगर येथे 80 मिलिमीटर, नवजाला 69 मिलिमीटर आणि महाबळेश्वरला 57 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ही आकडेवारी 30 जून २०२५ सकाळी 8 पर्यंतची आहे.
या धरणाची पाणी साठवण क्षमता 105.25 टीएमसी आहे. पायथा ग्रहातून 1050 क्यूसेक्स विसर्ग कोयना नदीपत्रात सुरु आहे. कोयना धरणाच्या नवीन तांत्रिक वर्षाला 1 जूनपासून प्रारंभ झाला. महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना धरणातील मुबलक पाणीसाठ्यामुळं यंदा वीजनिर्मितीसह पुर्वेकडील दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळाला. 31 मे अखेर धरणात 17.80 टीएमसी (17.77 टक्के) इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आहे. सोमवारी (30 जून) सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना धरणामध्ये साधारण 70 मिलिमीटर, नवजा येथे 69 मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 57 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे 105 टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा 51.20 टीएमसी इतका झाला असून धरण 48.65 टक्के भरले आहे.
एक जूनपासून आतापर्यंत कोयनेत 1 हजार 464 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत 1 हजार 263 आणि महाबळेश्वरमध्ये 1 हजार 376 मिलीमीटर पाऊस झाला आहे.














































































