Last Updated on 27 Mar 2026 9:55 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर |
महाराष्ट्र राज्यातील एक दिमाखदार,भव्य आणि नियोजनबद्ध बैलगाडा शर्यतीचे मैदान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कासेगाव (ता.वाळवा) येथील जयंत हिंदकेसरी बैलगाडा शर्यतीच्या ४ थ्या पर्वाचा मानकरी स्व.पंढरीशेठ फडके विघर पनवेल, शिवांश तुषार घोरपडे सदाशिवगड यांचा घरचा साज- सर्जा आणि रोमन ही जोडी ठरली आहे. त्यांना ५ लाख ६ हजार २६५ रुपयांची रोख रक्कम आणि भव्य सन्मान चिन्ह बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
अभूतपूर्व उत्साह आणि हजारो बैलगाडी शौकीनांच्या साक्षीने पार पडलेल्या या ऐतिहासिक मैदानातील विजेत्यांना माजी मंत्री आ.जयंत पाटील, माजी आ.मानसिंगराव नाईक,आष्ट्याचे नगराध्यक्ष विशाल शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील, उरुण ईश्वरपूरचे उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव, मुख्य संयोजक आणि युवा उद्योजक अतुलभाऊ लाहिगडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

या मैदानातील दुसऱ्या क्रमांकाचा विजेता यश बापूशेठ आंबेकर वडकी (पुणे),करण कराळ दांडेगांव यांचा सर्जा आणि मनोहर चव्हाण करोडी (छत्रपती संभाजीनगर) यांचा लखन,तिसरा विजेता साईराज किरणआप्पा कालगांव-शाळगाव उत्तमशेठ गवळी बदलापूर यांचा रैना,आणि भारतशेठ वळकुंडे निमगाव माळशिरस यांचा सावकार, चौथ्या क्रमांकाचा विजेता स्व. रामदास शेठ शंकर पाटील, आर्या मिलिंद पाटील पोसगाव अंबरनाथ,शार्दूलभैय्या कासेगाव यांचा भुंगा आणि शांडूमिस्त्री तळेगाव यांचा छोटा देवा, पाचव्या क्रमांकाचा विजेता कै.संजय शामराव जगदाळे (काका) शिरवडे यांचा निशाण, श्रेयस विकास वेताळ सुर्ली, संग्राम ग्रुप शिरवडे यांचा संग्राम, सहाव्या क्रमांकाचा विजेता विक्रमशेठ गोरे, अजयभाऊ गायकवाड अक्कलकोट यांचा छावा, तस्मैय्या जमीर सय्यद मदळापूर यांचा बदाम, तर सातव्या क्रमांकाचा विजेता पृथ्वीराजबाबा खुटवड फुरसुंगी पुणे, कु.शौर्या दैवत गोवेकर यांचा किसना आणि संजय सरगर गिरवी यांचा माहुली ठरला आहे.
दरम्यान सकाळी ९ वाजता मैदानाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील,जि.प.अध्यक्षा सौ.संगीता पाटील, जि. पं. सदस्य विराज नाईक,उरुण ईश्वरपूरचे उप नगराध्यक्ष खंडेराव जाधव,पं.स.सदस्या सौ.सुप्रिया पाटील,मुख्य संयोजक अतुल लाहिगडे, सौ. रुपाली जाधव,सौ.अनुपमा लाहिगडे यांच्या हस्ते करण्यात आला. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रा तील नामवंत शेकडो बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेचे स्मालोचन सुप्रसिद्ध समालोचक सुनिल मोरे पेडगाव,रणजित बनसोडे बांबवडे व चंद्रकांत कोकाटे वडूज यांनी केले. कासेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हरिश्चद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
विकास लाहिगडे,विक्रम गावडे,मकरंद माने, सोमनाथ लाहिगडे,अक्षय लाहिगडे,विकास पाटील(भैया),माळशिद शेंडगे,संभाजी पाटील, जितेंद्र पाटील,काका पाटील,शरद शिनगारे,योगेश मोठे,संजय लाहिगडे,अभि दंडवते,अमोल ठोंबरे, दिग्विजय बडेकर,अभि आडके,सोमनाथ जंगम, सागर कांबळे,सौरभ शहा,अविनाश देसाई, अभिनय उबाळे,कनया बोडरे,सुशांत माने,उत्तम गेजगे,अनिकेत शिरटेकर,सुरज देशमुख,विनोद लाहिगडे, प्रवीण लाहिगडे, राहुल लाहिगडे,मोन्या मुल्ला,बाळू म्हासोलीकर,तसेच शरद लाहिगडे (आण्णा) फाउंडेशन महाराष्ट्र राज्यच्या कार्यकर्त्यां नी हे मैदानात यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
‘हेलिकॉप्टर सफर’ हे मैदानाचे खास आकर्षण
या मैदानाचा आनंद लुटण्यासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या महिलांच्यामधून लकी ड्रॉने महिलांची निवड करून त्यांची हेलिकॉप्टरने रामलिंग बेट सफर करण्यात आली. या सफरीच्या भाग्यवान सौ.राणी राजेंद्र पाटसुते आणि कु.धनश्री बाजीराव पाटसुते या महिला ठरल्या. तसेच विजेत्यामधीलही भाग्यवान बैलगाडी मालक-चालकांची आणि हौशी प्रवाशांना ही सफर घडविण्यात आली.
बकासुर आणि मथुर सेमी फायनलला बाहेर…
१३ वेळचा हिंदकेसरी बकासुर आणि बिनजोड चा बादशहा मथुर या नामवंत बैलगाड्या सेमी फायनलला बाहेर पडल्याने बैलगाडी शौकीनांची निराशा झाली.










































































