Last Updated on 20 Feb 2026 3:45 PM by Sanjay Patil/Adhorekhit
आ.जयंत पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
दत्त टेकडी परिसराची पहाणी करून घेतला कामांचा आढावा
ईश्वरपूर ।
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी उरुण ईश्वरपूर येथील दत्त टेकडी परिसराला भेट देऊन येथील सोई-सुविधांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी उर्वरित विकास कामांचे प्रस्ताव करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन आपण या कामांच्या मंजुरीबद्दल राज्याच्या वनमंत्र्यांशी चर्चा करू, अशी ग्वाही दिली. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता स्वप्नील पाटील, कुंडलिक पाटील, उपवनसंरक्षक सागर गवते, शिराळा- वाळवा वनक्षेत्रपाल रमेश कांबळे, नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
आ.जयंत पाटील म्हणाले,या परिसरात खुल्या व्यायाम शाळेसाठी जागा निश्चित करावी,ही व्यवस्था करता येईल. येथे राजारामबापू सहकारी बँकेच्या माध्यमातून बस थांबा स्थानक उभारण्यात येईल. उरुण ईश्वरपूर नगरपालिकेने तशी राजारामबापू सहकारी बँकेकडे मागणी करावी. सटवाई मंदीर परिसराची सुधारणा करून येथे महिलांची बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी. दत्त टेकडी परिसरात येण्याच्या वेळा निश्चित करून गरजेप्रमाणे सूचना देण्यासाठी ध्वनी क्षेपकाची व्यवस्था करावी. या परिसरात उत्पन्नाचे स्रोत काय उभा करता येतील? याचाही विचार व्हावा.
शहाजी पाटील म्हणाले,आ.जयंतराव पाटील यांनी १९८४ साली राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष असताना दत्त टेकडीस कुंपण घातले. तसेच कारखान्याच्या पाणी पुरवठा संस्थेतून झाडांना पाणी उपलब्ध करून दिले. त्यानंतर मंत्री पदाच्या काळात कोट्यावधी रुपयां चा निधी उपलब्ध करून देत शहराच्या सौंदर्यात भर घालणारे हे दत्त टेकडीचे वैभव फुलविले आहे.
हेही वाचा : [ईश्वरपूरमध्ये MHT-CET साठी २६ फेब्रुवारीपासून क्रॅश कोर्सची सुरुवात]
उपअभियंता स्वप्नील पाटील, उप वन संरक्षक सागर गवते यांनी आ.जयंत पाटील यांना दत्त टेकडी परिसरातील विविध कामांची व उर्वरित कामांची सविस्तर माहिती दिली. आ.पाटील यांनी अधिकाऱ्यांशी विविध मुद्द्यावर सविस्तर चर्चा करून सूचना केल्या.
याप्रसंगी ॲड. धैर्यशील पाटील, नगरसेवक सुनिल मलगुंडे, नगरसेवक स्वरूप मोरे, सभापती संदीप माने, नगरसेवक संग्राम पाटील, प्रवीण पाटील, सुहास पाटील, तसेच संबंधित अधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.












































































