Last Updated on 06 Apr 2026 9:42 PM by Sanjay Patil/Adhorekhit
हुबालवाडीजवळील दक्षिणाभिमुखी मारुती मंदिराजवळ थरार
ईश्वरपूर ।
ईश्वरपूर-बहे रस्त्यावर आज (रविवारी) रात्री ९:३० च्या सुमारास बिबट्याने दुचाकीस्वारांवर अचानक हल्ला केल्याची घटना घडली आहे. हुबालवाडी जवळील दक्षिणाभिमुखी मारुती मंदिराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने थेट दुचाकीवर झडप घातली. या हल्ल्यात कराड येथील एक युवक जखमी झाला असून, सुदैवाने अन्य दोघे जण थोडक्यात बचावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कराड येथील राजेंद्र माने हे ईश्वरपूर एमआयडीसीमध्ये कामानिमित्त आले होते. रात्री काम आटोपून ते आपला पुतण्या अथर्व संजय माने (वय २५, रा. मलकापूर, कराड) आणि अन्य एका सहकाऱ्यासह दुचाकीवरून बहेच्या दिशेने निघाले होते. हुबालवाडीजवळील मारुती मंदिराजवळ दुचाकी आली असता, अचानक झुडपातून बिबट्या बाहेर आला आणि त्याने चालत्या गाडीवर झडप घातली.
या हल्ल्यात अथर्व माने याच्या डाव्या पायाच्या घोट्याला बिबट्याच्या नख्या लागून तो जखमी झाला आहे. राजेंद्र माने हे गाडी चालवत होते. त्यांनी प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. हल्ल्यानंतर बिबट्या पुन्हा अंधारात पसार झाला. जखमी अथर्वला तात्काळ ईश्वरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. पुढील उपचारासाठी त्याला कराड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
![]()
![]()
या घटनेमुळे ईश्वरपूर-बहे पट्ट्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याचे बोलले जात आहे. रात्रीच्या वेळी दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 07 Apr 2026 10:42 PM by Sanjay Patil/Adhorekhit मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (मंगळवारी) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीस उ... Read more










































































