Last Updated on 18 Sep 2021 2:46 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई : आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्राला 19 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यात भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. तसेच आयपीएलमधील काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे बीसीसीआयने आयपीएल 2021 स्पर्धा तात्काळ स्थगित केली होती. आता या आयपीएल 2021 मधील उर्वरित सामने पुन्हा खेळवले जाणार आहेत. 19 सप्टेंबर रोजी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याने दुसऱ्या सत्राला सुरूवात होईल. उभय संघातील सामन्याला दुबईत सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरूवात होणार आहेत.

आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्राचे वेळापत्रक

- 19 सप्टेंबर: चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स सायंकाळी 7:30 वाजता
- 20 सप्टेंबर: कोलकाता नाइट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सायंकाळी 7:30 वाजता
- 21 सप्टेंबर: पंजाब किंग्स वि. राजस्थान रॉयल्स सायंकाळी 7:30 वाजता
- 22 सप्टेंबर: दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायझर्स हैदराबाद सायंकाळी 7:30 वाजता
- 23 सप्टेंबर: मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स सायंकाळी 7:30 वाजता
- 24 सप्टेंबर: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स सायंकाळी 7:30 वाजता
- 25 सप्टेंबर: दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स दुपारी 3:30 वाजता
- दुसरा सामना: सनरायझर्स हैदराबाद वि पंजाब किंग्स सायंकाळी 7:30 वाजता
- 26 सप्टेंबर: चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाइट रायडर्स दुपारी 3:30 वाजता
- दुसरा सामना: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स सायंकाळी 7:30 वाजता
- 27 सप्टेंबर: सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स सायंकाळी 7:30 वाजता
- 28 सप्टेंबर: कोलकाता नाइट रायडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स दुपारी 3:30 वाजता
- दुसरा सामना: मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स सायंकाळी 7:30 वाजता
- 29 सप्टेंबर: राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सायंकाळी 7:30 वाजता
- 30 सप्टेंबर: सनरायझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स सायंकाळी 7:30 वाजता
- 1 ऑक्टोबर: कोलकाता नाइट रायडर्स वि. पंजाब किंग्स सायंकाळी 7:30 वाजता
- 2 ऑक्टोबर: मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स दुपारी 3:30 वाजता
- दुसरा सामना: राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स सायंकाळी 7:30 वाजता
- 3 ऑक्टोबर: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स दुपारी 3:30 वाजता
- दुसरा सामना: कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद सायंकाळी 7:30 वाजता
- 4 ऑक्टोबर: दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स सायंकाली 7:30 वाजता
- 5 ऑक्टोबर: राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स सायंकाळी 7:30 वाजता
- 6 ऑक्टोबर: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. सनरायझर्स हैदराबाद सायंकाळी 7:30 वाजता
- 7 ऑक्टोबर: चेन्नई सुपर किंग्स वि. पंजाब किंग्स दुपारी 3:30 वाजता
- दुसरा सामना: कोलकाता नाइट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स सायंकाळी 7:30 वाजता
- 8 ऑक्टोबर: सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स दुपारी 3:30 वाजता
- दुसरा सामना: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स सायंकाळी 7:30 वाजता
- 10 ऑक्टोबर: क्वालीफायर 1
- 11 ऑक्टोबर: एलीमिनेटर
- 13 ऑक्टोबर: क्वालीफायर 2
- 15 ऑक्टोबर: फायनल

IPL 2021 च्या पहिल्या पर्वात कोणी जिंकले किती सामने?
पहिल्या पर्वात दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्सने 8-8 सामने खेळले असून इतर संघानी 7-7 सामने खेळले आहेत. यामध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ सर्वात यशस्वी असून त्यांनी 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. त्यानंतर चेन्नई सुपरकिंग्सला महेंद्र सिंह धोनीने 7 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले आहेत.
कोहलीच्या आरसीबीसाठी यंदाची आयपीएल उत्तम
भारताचा कर्णधार विराट कोहलीने आतापर्यंत एकही आयपीएलचे जेतेपद पटकावलेले नाही. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये विराटचा संघ रॉयल चँलेंजर्स बंगळुरु उत्तम प्रदर्शन करत आहे. त्यांनी उत्तम सुरुवात करत 7 पैकी 5 सामन्यांत विजय मिळवला आहे. त्याशिवाय भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माची मुंबई इंडियन्स यंदा 7 पैकी 4 सामने जिंकली आहे.
हैद्राबाद संघाची परिस्थिती सर्वात खराब
संजू सॅमसन कर्णधार असलेली राजस्थान रॉयल्स यंदा 7 पैकी 3 सामने जिंकली आहे. तर पंजाब किंग्स 8 सामन्यांपैकी 3 सामन्यात विजय मिळवू शकली आहे. त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स केवळ दोनच सामने जिंकली आहे. पण या सर्वात सर्वात खराब परिस्थिती हैद्राबाद संघाची असून त्यांनी सात पैकी केवळ एकच सामना जिंकला आहे.











































































