Last Updated on 29 Apr 2023 7:14 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सध्या सोशल मीडियावर ज्या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे असा हा ‘चौक’ या चित्रपट येत्या १९ मे रोजी प्रदर्शित होत आहे.सोशल मीडियावर म्हणा किंवा चौका-चौकात म्हणा…सध्या सगळीकडे फक्त ‘चौक’ चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे.आता या चर्चेत आणखी भर पडली आहे.ती म्हणजे या चित्रपटातील ‘जाळ जाळ झाला रे’ या गाण्यामुळे ! ‘चौक’ची निर्मिती अनुराधा प्रॉडक्शन्सच्या दिलीप लालासाहेब पाटील यांनी केली आहे.
![]()
![]()
हे गाणं नुकतंच रिलीज झाले आणि सगळ्यांच्या सोशल मीडियावर दिसू लागले आहे.त्यामुळे चौकची वाट बघणाऱ्या प्रेक्षकांमध्ये आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे.जाळ जाळ झाला रे’ या गाण्याचे संगीत,शब्द आणि भन्नाट डान्स यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसतंय.एका समारंभात सर्वजण जल्लोष करत आहेत,उत्साहाने नाचत,आनंद व्यक्त करत आहेत.प्रविण तरडे, उपेंद्र लिमये, किरण गायकवाड आणि संस्कृती बालगुडे हे कलाकार ‘जाळ जाळ झाला रे’वर थिरकताना दिसत आहेत..
या गाण्याच्या संगीतामुळे विशेष लक्ष वेधलं असून,संगीतकार ओंकारस्वरूप यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे,विनायक पवार यांच्या भन्नाट शब्दांनी अगदी सगळ्यांना नाचायला भाग पाडलं आहे. तसेच, नागेश मोरवेकर यांच्या हटके स्टाईल गायनामुळे हे गाणं खूप व्हायरल होत आहे.या गाण्याचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे,यातील डान्स.प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं असून,यातील हूकस्टेप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
![]()
![]()
‘चौक’ची निर्मिती अनुराधा प्रॉडक्शन्सच्या दिलीप लालासाहेब पाटील यांनी केली असून,प्रोजेक्ट व प्रॉडक्शन हेड महावीर होरे आहेत.तर,चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केले आहे.या यापूर्वी देवेंद्र यांनी देऊळ बंद,मुळशी पॅटर्न,बबन,रेगे धर्मवीर,सरसेनापती हंबीरराव हिंदीतील तानाजी या चित्रपटांमध्ये परिणामकारक भूमिका साकारली होती.हा चित्रपट 19 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.मराठी चित्रपटांमधील स्पर्धा टळावी यासाठी या चित्रपटाने आपल्या प्रदर्शनाची तारीख पुढे घेत मराठी चित्रपटसृष्टीत एक उत्तम आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.सर्व मराठी चित्रपटांना प्रेक्षकवर्ग मिळावा यासाठी उचललं हे विधायक पाऊल आहे.
प्रविण तरडे,उपेंद्र लिमये,रमेश परदेशी,किरण गायकवाड,स्नेहल तरडे,सुरेश विश्वकर्मा,संस्कृती बालगुडे,अक्षय टंकसाळे,शुभंकर एकबोटे,सुनिल अभ्यंकर,अंजली जोगळेकर असे अनेक कलाकार या चित्रपटात हटके भूमिकांमध्ये दिसतील.यामुळे मराठी प्रेक्षकांना पुन्हा एकदा मल्टिस्टारर चित्रपटाचा आनंद मिळणार हे नक्की!
जाळ जाळ झाला रे’ जोरदार व्हायरल व्हायरल होत आहे.त्यामुळे ‘चौक’ची वाट बघणाऱ्या प्रेक्षकांमध्ये आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्रा.संजय थोरात यांनी तरुणाईचा action चित्रपट असलेल्या ‘चौक’ विषयी केलेले परीक्षण
![]()












































































