Last Updated on 15 Oct 2022 7:37 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | महिला आशिया चषक स्पर्धेत भारताने इतिहास रचत सातव्यांदा विजेतेपद पटकावले आहे.सिल्हेट मैदानावर पार पडलेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने 8 विकेट्सने हा सामना जिंकला. या सामन्यात गोलंदाज आणि फलंदाज अशा दोन्ही विभागांनी मोलाचे योगदान दिले.
भारताने श्रीलंकेचे 66 धावांचे आव्हान 8 फलंदाज आणि जवळपास 11 षटके राखून पार करत महिला आशिया कपवर सातव्यांदा कब्जा केला. भारताकडून सलामीवीर स्मृती मानधनाने 25 चेंडूत 51 धावांची धडाकेबाज खेळी केली. भारताच्या 71 धावांमधील 51 धावा एकट्या स्मृती मानधनाने केल्या.ज्यावेळी जिंकण्यासाठी एका धावेची गरज होती.त्यावेळी स्मृति मांधनाने सिक्स मारुन चाहत्याची मनं जिंकली.
भारताकडून रेणुका सिंहने भेदक मारा करत 3 विकेट्स मिळवल्या. श्रीलंका 50 धावा तरी करतोय की नाही अशी अवस्था असताना इनोका रणवीराने 22 चेंडूत 18 धावांची खेळी करत लंकेला 65 धावांपर्यंत पोहचवले. तिने श्रीलंकेचा ऑला आऊटही होऊ दिला नाही.
आतापर्यंत 8 वेळा महिला आशिया कपचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक वेळी भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारताने 7 वेळा हा चषक जिंकला आहे. तर बांगलादेशने 2018 मध्ये फायनलमध्ये भारताचा पराभव करून स्पर्धा जिंकली होती.












































































