Last Updated on 06 Mar 2022 12:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
सांगली येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आणि सांगली जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियान व राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत शनिवारपासून सुरु झालेल्या तीन दिवस धान्य आणि फळ महोत्सवास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन झाले.या प्रदर्शनात धान्य व फळे महोत्सवात अनेक जातीचे दर्जेदार धान्य व फळे ठेवण्यात आली आहेत.ग्राहकांना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून दर्जेदार फळे व धान्य मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतीमाल योग्य दरात उपलब्ध होत आहे. हा महोत्सव तीन दिवस सुरू राहणार आहे.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी म्हणाले,शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या धान्य व फळांना योग्य मोबदला मिळण्यासाठी धान्य व फळे महोत्सवा सारखे कार्यक्रम खूप उपयुक्त ठरत आहेत. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या दर्जेदार शेतीमाल ग्राहकांना थेट उपलब्ध होत आहे त्यामुळे ग्राहकांना दर्जेदार व शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्यास अशा महोत्सवांचे आयोजन उपयुक्त ठरते.
यावेळी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ, महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे, आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे, नगर अभियंता परमेश्वर अलकुडे, पाणीपुरवठा अधिकारी सुनील पाटील, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर,उपविभागीय कृषी अधिकारी पी के सुर्यवंशी आणि एसीबी खटकाळे, कृषी उपसंचालक प्रियांका भोसले आदी उपस्थित होते.
यावेळी कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार बेता यांनी धान्य व फळे महोत्सवाची पार्श्वभूमी व सविस्तर माहिती दिली.














































































