Last Updated on 04 Mar 2022 8:29 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.दिग्गज फिरकी गोलंदाजाला क्रीडाविश्व मुकले आहे.शेन वॉर्न यांनी 1992 मध्ये पहिली टेस्ट मॅच खेळली होती. श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरननंतर ते दुसरे गोलंदाज होते, ज्यांनी 1000 आंतरराष्ट्रीय विकेट मिळवल्या होत्या.
श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरननंतर सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम वॉर्न यांच्या नावावर आहे.त्यांनी 1992 ते 2007 पर्यंत145 कसोटी सामने खेळले, ज्यात त्यांनी 25.41 च्या गोलंदाजीच्या सरासरीने 708 बळी घेतले.मुरलीधरनने कसोटीत 800 बळी घेतले.1993 ते 2005 पर्यंत वॉर्नने 194 एकदिवसीय सामन्यांमध्ये 293 विकेट घेतल्या.1999 च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघात त्यांचा मोलाचा वाटा होता. मुरलीधरननंतर कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 1000 आंतरराष्ट्रीय विकेट घेणारे वॉर्न हे जगातील दुसरे गोलंदाज ठरले.
ऑस्ट्रेलियन न्यूज चॅनल फॉक्स स्पोर्टच्या वृत्तानुसार, शेन वॉर्न थायलंडमध्ये होते आणि तेथे त्याचा अचानक संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. शेन वॉर्न यांच्या व्यवस्थापन संस्थेच्या हवाल्याने फॉक्स स्पोर्टने एक निवेदन दिलेय. शेन वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये होते, जेथे ते शनिवारी सकाळी (ऑस्ट्रेलियन वेळेनुसार) बेशुद्धावस्थेत आढळले होते, परंतु वैद्यकीय पथकाच्या सर्वतोपरी प्रयत्नांनंतरही ते शुद्धीवर येऊ शकले नाहीत. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले जात आहे. शेन वॉर्न थायलंडच्या कोह सामुई बेटावर होते आणि तिथे त्यांच्या व्हिलामध्ये राहत होते.
दरम्यान,शेन वॉर्न यांचा नोव्हेंबर २०२१ बाईक अपघात झाला होता.त्यात ते जखमी झाले होते.ते आपला मुलगा जॅक्सनसोबत मेलबर्नमध्ये ३०० किलोच्या बाईकवर राईड करत होते. त्यांना कुल्ला, गुडघा आणि टाचेला दुखापत झाली होती.












































































