Last Updated on 19 Feb 2022 11:15 PM by Sanjay Patil/Adhorekhit
भारताच्या उपकर्णधारपदी एका वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराची निवड
विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना टी-20I मालिकेसाठी विश्रांती
संघात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या नावांचा समावेश नाही
कुलदीप यादवचे प्रदीर्घ कालावधीनंतर संघात पुनरागमन;त्याचबरोबर सौरभ कुमारच्या रूपाने नवा चेहरा
नवी दिल्ली ।
भारतीय संघाला कसोटी संघाला नवा कर्णधार मिळाला आहे.आता तिन्ही फॉरमॅटची कमान रोहित शर्माच्या हाती असणार आहे. भारतीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली. यासोबतच श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या 3 सामन्यांच्या टी-20 आणि कसोटी मालिकेसाठीही टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना टी-20I मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.यावेळी भारताच्या उपकर्णधारपदी एका वेगवान गोलंदाजाची वर्णी लागली आहे.
चेतन शर्मा म्हणाले, भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. जिथे रोहित प्रथमच कसोटी संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. २०१३ मध्ये भारतासाठी पहिली कसोटी खेळणारा रोहित शर्मा हा टीम इंडियाचा ३५ वा कसोटी कर्णधार असेल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली कसोटी ४ मार्चपासून मोहाली येथे खेळवली जाणार आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी आता जसप्रीत बुमराची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. कारण या मालिकेत रिषभ पंत नसणार आहे. त्याचबरोबर या मालिकेत बुमराचे पुनरागमन होत आहे. त्यामुळे संघात पुनरागमन करत असताना बुमराला ही आनंदाची बातमी मिळाली आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आलेल्या संघात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या नावांचा समावेश नाही. तसेच वृद्धीमान साहा आणि इशांत शर्मा सारखे दिग्गज देखील या संघाचा भाग नाहीत. कुलदीप यादवचे प्रदीर्घ कालावधीनंतर संघात पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर सौरभ कुमारच्या रूपाने नवा चेहरा घेण्यात आला आहे.
टीम इंडियावर आता यापुढील काहीकाळ मुंबईच्या रोहित शर्माची सत्ता असणार आहे विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर रोहितकडे टी-२० आणि वन-डे संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आले होते.यानंतर आता रोहितकडे भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आली आहे.विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेत १-२ या पराभवानंतर आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.
कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर भारताचा पुढचा कसोटी कर्णधार कोण, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू होती. रोहितशिवाय केएल राहुल, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांचीही नावं कर्णधारपदाच्या शर्यतीत होती, मात्र रोहित शर्माने यात बाजी मारली.
टी-20 टीम
रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, आवेश खान.
कसोटी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत, केएस भरत, आर अश्विन (फिटनेस), रवींद्र जडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार.
असा असेल श्रीलंकेचा दौरा
- पहिला टी-20 सामना- 24 फेब्रुवारी, लखनौ
- दुसरा टी-20 सामना- 26 फेब्रुवारी, धरमशाला
- तिसरा टी-20 सामना- 27 फेब्रुवारी, धरमशाला
- पहिली कसोटी- 4 ते 8 मार्च, मोहाली
- दुसरी कसोटी- 12 ते 16 मार्च, बंगळुरू












































































