झेंडूच्या फुलांच्या चहामुळे मनावरील ताण कमी होतो
झेंडूच्या फुलांचा चहा म्हटल्यावर तुम्हाला वाटेल असला चहा असतो का कधी.पण खरंच झेंडूच्या फुलांचा चहा असतो आणि हा चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो.
.
हिंदू धर्मात कोणताही सण असो त्या दिवशी सजावटीसाठी किंवा देवाच्या पूजेसाठी झेंडूची फुले ही आणली जातात. प्रत्येक सणाला झेंडूंच्या फुलांना एक महत्त्वाचे स्थान आहे. फुलांची सजावट ही झेंडूंच्या फुलांशिवाय पूर्णच होऊच शकत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का झेंडूची फुले ही केवळ देवाला वाहण्यासाठी किंवा सुशोभनासाठी नाही तर झेंडूच्या फुलांचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. आपण पाहिले तर आयुर्वेदातही झेंडूच्या फुलांचे फायदे सांगितले आहेत. त्याचप्रमाणे मनावरील ताण,थकवा, घावण्यासाठी देखील झेंडूच्या फुलांचा मोठा फायदा होतो. झेंडूच्या फुलांचा चहा प्यायल्याने आपल्याला रिफ्रेश वाटते त्यामुळे झेंडूच्या फुलांचा असाही एक उपयोग करता येतो.
झेंडूच्या चहा आरोग्यासाठी आहे फायदेशीर
जर आपण झेंडूच्या फुलांचा वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांचा केला तर त्यांच्यामध्ये अँटिऑक्सिडंट गुण मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे मानसिक ताण तणाव कमी होण्यास खूप मदत होते. काही कारणामुळे अंगावर येणारी सूज, शरीरातील अतिरिक्त चरबी आणि मधुमेह चहा प्यायला मुळे कमी केले जाऊ शकतात.तसेच काहींना दात दुखी चे समस्या असते.काहींना त्वचेसंबंधी समस्या असतील तर झेंडूच्या फुलांचा चहा प्यायल्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होतात.चेहऱ्यावर मुरुम आणि पुरळ येण्याच्या समस्यांपासून सुटका होते.
दात दुखीसाठी आहे फायदेशीर
झेंडूच्या फुलांचा चहा प्यायल्यामुळे दात दुखीची समस्या दूर होते. यासाठी झेंडूचा चहा थोडासा थंड करा आणि त्याने गुळणा करा.
झेंडूच्या फुलांची चहा तयार करण्याची पद्धत
हा चहा तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर दोन ग्लास पातेल्यात पाणी घ्यावे. आता ते पातेले गॅसवर ठेवावे. पाणी उकळायला लागल्यावर त्यामध्ये झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या टाकाव्यात. नंतर त्या पातेल्यावर पाच मिनिटांसाठी झाकण ठेवावे.झाकण ठेवल्यानंतर थोडा गॅस कमी करावा व पाणी चांगले उकळू द्यावे. या प्रक्रियेमध्ये झेंडूच्या फुलांच्या रंग पाण्यामध्ये उतरलेला दिसेल.हे पाणी अर्धे होईपर्यंत उकळत राहावे. नंतर या पाण्यामध्ये मध मिसळावे. अशाप्रकारे झेंडूच्या फुलांचा चहा तयार करून तुम्ही तो पिऊ शकता.