ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर 3 मोठ्या घोषणा
नवी दिल्ली |
येत्या 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींना कोरोना लस देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशाला संबोधित करताना केली.आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी बूस्टर डोस सुरु करण्यात येणार असल्याचीही घोषणा मोदी यांनी केली आहे.
व्हायरस जेवढ्या दुपटीने वाढतोय. तेवढा विश्वास सुद्धा द्विगुणित होत आहे. आयसीयू आणि नॉन आयसीयू बेड्स असे एकूण मिळून ९० हजार बेड्स उपलब्ध आहेत. विशेषत: लहान मुलांसाठी देखील आहेत. आज देशभरात तीन हजार पेक्षा जास्त पीएसए ऑक्सिजन आहेत. चार लाख ऑक्सिजन सिलेंडर्स संपूर्ण देशात देण्यात आले आहेत, असं मोदी म्हणाले.
आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देण्यात येणार
जे कोरोना योद्धा आहेत. हेल्थ केअर आणि फ्रंटलाईन वर्कर्सचं देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी मोठं योगदान आहे. ते आज सुद्धा कोरोना बाधित रूग्णांना मदत करत आहेत. त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे. १० जानेवारी २०२२ पासून आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधनात तीन मोठे निर्णय केले जाहीर
1 १५-१८ वयोगटातील मुलांसाठी ३ जानेवारी २०२२ पासून लसीकरण सुरू करणार.
2. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी १० जानेवारी २०२२ पासून बुस्टर डोसची सुरुवात होणार.
3. वयोवृद्धांसाठी देखील खबरदारी म्हणून १० जानेवारी २०२२ पासून बुस्टर डोस दिला जाणार.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्याच्या प्रधानमंत्र्यांच्या घोषणेचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइनर्स यांना बूस्टर डोस देण्याच्या केलेल्या घोषणेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे. बूस्टर डोस देण्यासंदर्भात नुकतीच राज्य मंत्रिमंडळातदेखील चर्चा झाली होती आणि आमची ती मागणी होतीच असे मुख्यमंत्री म्हणतात.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील सात डिसेंबर रोजी पत्र लिहून मुलांना लसीकरण करण्याची तसेच बूस्टर डोस देण्याची विनंती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना केली होती
याशिवाय पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांनादेखील लसीकरण केल्याने विषाणूचा पुढील संसर्ग रोखण्यासाठी निश्चितपणे मदत होईल तसेच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनादेखील बूस्टर डोसमुळे फायदा मिळेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात.