Last Updated on 18 Apr 2026 9:52 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर ।
सालाबाद प्रमाणे होणारी बहे (ता. वाळवा ) येथील श्री भैरवनाथाची यात्रा यंदा १९ एप्रिलपासून होत आहे. यात्रा पारंपरिक पद्धतीने होणार असल्याची माहिती सरपंच संतोष दमामे, उपसरपंच सौ. धनश्री थोरात यांनी दिली.
रविवारी सायंकाळी ४ वाजता पालखी निघणार आहे. पालखीबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पालखी मिरवणूक पारंपरिक वाद्यांसह काढण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी सोमवार असल्याने मांसाहाराचे नियोजन मंगळवारी करण्यात आले आहे. दि. २४ रोजी तुफान हा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे.
यात्रेसाठी मांसाहाराचे दर कमी…
गावात सध्या वाट्याच्या मटणाचा किलोचा दर ७८० रुपये तर सरसकट (टांगून) मटणाचा दर ७४० रुपये आहे. यात्रेसाठी वाट्याच्या मटणाचा दर २० रुपयाने कमी तर सरसकट (टांगून) मटणाचा दर २० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय करण्यात आला.तर चिकन दर प्रति किलो २० रुपयांनी कमी केला जाणार आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 18 Apr 2026 10:44 PM by Sanjay Patil/Adhorekhit मुंबई । अक्षय्य तृतीयेच्या या शुभमुहूर्तावर राज्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळ्यांचे आयोजन होत असल्याने बालविवाह रोखण्यासाठी... Read more














































































