Last Updated on 28 Jan 2026 12:24 PM by Sanjay Patil/Adhorekhit
बहुतांश गट व गणांमध्ये थेट लढती, पक्षीय राजकारणासोबतच स्थानिक समीकरणेही निर्णायक ठरणार
सांगली ।
वाळवा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा रणसंग्राम अखेर स्पष्ट झाला आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर अर्ज मागे घेतल्याने जिल्हा परिषदेसाठी ३०, तर पंचायत समितीसाठी ५३ उमेदवार अंतिम रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश गट व गणांमध्ये थेट, काट्याच्या लढती होणार असल्याचे चित्र आहे.
महायुतीतील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट) व रयत क्रांती पक्ष यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अशी लढत अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. काही गटांमध्ये मात्र स्थानिक समीकरणांमुळे नेत्यांच्या आघाड्या, बंडखोरी आणि अपक्ष उमेदवारी निर्णायक ठरणार आहेत.
बोरगाव गटात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी (श. प.), तर कासेगाव, वाटेगाव, बावची, बागणी, येलूर आदी गटांत महायुती विरुद्ध राष्ट्रवादी (श. प.) अशी थेट लढत रंगणार आहे.
जिल्हा परिषद – गटनिहाय उमेदवार
अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर वाळवा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी स्पष्ट झाली आहे. बहुतांश गट व गणांमध्ये थेट तसेच तिरंगी लढती होत असून पक्षीय राजकारणासोबतच स्थानिक समीकरणेही निर्णायक ठरणार आहेत.
रेठरेहरणाक्ष गट
प्रतिमा सुजित मोरे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – श. प.)
राजश्री पांडूरंग मोरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
विद्या उत्तम मोरे (वंचित बहुजन आघाडी)
बोरगाव गट
जयश्री जितेंद्र पाटील (काँग्रेस)
कांता शिवाजी वाटेगावकर (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – श. प.)
कासेगाव गट
संगीता संभाजीराव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – श. प.)
जयश्री विश्वास माने (भाजप)
वाटेगाव गट
जोती अमोल पाटील (भाजप)
संध्या आनंदराव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – श. प.)
जयश्री जयसिंग उथळे (अपक्ष)
पेठ गट
पूजा गणेश दाभोळे (भाजप)
मंदा भगवान माळी (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – श. प.)
वाळवा गट
संताजी रघुनाथ मेटकरी (शिवसेना)
सर्जेराव वसंत देशमुख (वंचित बहुजन आघाडी)
नेताजी भास्कर पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – श. प.)
कामेरी गट
जयराज चंद्रकांत पाटील (भाजप)
रणजीत जगदीश पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – श. प.)
प्रकाश आनंदा कदम (अपक्ष)
रणजीत सूर्यकांत पाटील (अपक्ष)
हंबीरराव आनंदराव पाटील (अपक्ष)
चिकुर्डे गट
अभिजीत शिवाजीराव पाटील (शिवसेना – उबाठा)
अशोक बाजीराव पाटील (भाजप)
बावची गट
धैर्यशील मानसिंग थोरात (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – श. प.)
विक्रम शंकर पाटील (शिवसेना)
आनंदराव तुकाराम थोरात (पश्चिम महाराष्ट्र स्वराज्य पक्ष)
बागणी गट
उर्मिला संतोष घनवट (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – श. प.)
मोहिनी सागर खोत (रयत क्रांती पक्ष)
सुषमा शशिकांत शिखरे (वंचित बहुजन आघाडी)
येलूर गट
हर्षदा राहुल महाडीक (भाजप)
देविका भोजराज राजेघोरपडे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – श. प.)
पंचायत समिती – गणनिहाय उमेदवार
नेर्ले गण
समर्थ सतीश पाटील (भाजप)
महेश मोहन पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – श. प.)
कासेगाव गण
सुप्रिया देवराज पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – श. प.)
संध्या गणेश पाटील (भाजप)
वाटेगाव गण
प्रकाश गणपतराव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – श. प.)
हेमंत आनंदराव मुळीक (भाजप)
संदीप महादेव धुमाळ (रिपब्लिक सेना)
रेठरेधरण गण
वर्षा भिकाजी कोळेकर (भाजप)
रेश्मा श्रीकांत गुरव (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – श. प.)
येलूर गण
पुष्कराज पांडूरंग महाडीक (भाजप)
दिलीप रामचंद्र पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – श. प.)
लक्ष्मण श्रीपती डवरी (वंचित बहुजन आघाडी)
बहादूरवाडी गण
विमन मारुती खोत (भाजप)
हर्षली धैर्यशील पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – श. प.)
बागणी गण
उदयसिंह प्रतापराव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – श. प.)
निवास शामराव पाटील (रयत क्रांती पक्ष)
कारंदवाडी गण
प्रशांत प्रतापराव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – श. प.)
अनिल जयसिंग सरदेशमुख (रयत क्रांती पक्ष)
बावची गण
शुभांगी प्रशांत पाटील (शिवसेना)
सीमा प्रदीप पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – श. प.)
गोटखिंडी गण
निता चंद्रकांत पाटील (शिवसेना)
प्रियांका मकरंद पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – श. प.)
कुरळप गण
प्रदीप आकाराम कांबळे (भाजप)
शशिकांत सखाराम वायदंडे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – श. प.)
चिकुर्डे गण
सुरज दिलीप पवार (भाजप)
उत्तम आनंदराव पाटील (अपक्ष)
प्रकाश रघुनाथ पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – श. प.)
राजेंद्र वसंतराव पाटील (अपक्ष)
ऐतवडे बु. गण
धनंजय सुभाष शेटे (भाजप)
सागर रामचंद्र नांगरे (अपक्ष)
शिवाजी आप्पा माळी (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – श. प.)
कामेरी गण
शहाजी विश्वास पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – श. प.)
शुभम तुकाराम पाटील (भाजप)
पडवळवाडी गण
रुपाली श्रीकृष्ण पाटील (शिवसेना)
दिपाली अनिल थोरात (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – श. प.)
श्रीदेवी सुधीर मोरे (अपक्ष)
वाळवा गण
प्राची राहुल अहिर (शिवसेना)
वैशाली चंद्रशेखर शेळके (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – श. प.)
साखराळे गण
दिलीप मनोहर जंगम (भाजप)
प्रदीप तुकाराम पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – श. प.)
अक्षय तानाजी फुलारे (अपक्ष)
पेठ गण
वेणूताई विजय पाटील (भाजप)
वृषाली अतुल पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – श. प.)
बोरगाव गण
यदुराज उदयसिंग थोरात (काँग्रेस)
मनोज माणिकराव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – श. प.)
शहाजी पंतगराव पाटील (राष्ट्रीय समाज पक्ष)
चंद्रकांत शंकर खरात (अपक्ष)
ताकारी गण
रुपाली प्रकाश सपाटे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – श. प.)
प्रियंका अवधूत सावंत (काँग्रेस)
स्नेहल विकास पाटोळे (वंचित बहुजन आघाडी)
रेठरेहरणाक्ष गण
नुतन विशाल गडदे (राष्ट्रवादी काँग्रेस)
पूजा नितीन मलगौंडी (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – श. प.)
कि. म. गड गण
स्वाती संभाजी मदने (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – श. प.)
रेहाना हारुण शिकलगार (राष्ट्रवादी काँग्रेस)












































































