Last Updated on 30 Dec 2025 3:49 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आरटीओ आणि पोलीस प्रशासनाला आदेश
अहिल्यानगर । जिल्ह्यात ऊस वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरणे, रस्त्याच्या मधोमध वाहने चालवणे आणि वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणे आता महागात पडणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी धोकादायक वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तात्काळ कायदेशीर कारवाईचे आदेश आरटीओ (RTO) आणि पोलीस प्रशासनाला दिले आहेत.
ग्रामीण रस्त्यांची क्षमता १२-१५ टन असताना ५० टनांपर्यंत वाहतूक करणाऱ्यांवर नजर ठेवली जाईल. ट्रॅक्टरमधील मोठ्या आवाजातील म्युझिक सिस्टिममुळे हॉर्न ऐकू न आल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचेही आदेश दिले आहेत.
दरम्यान, ट्रॉलीच्या बाहेर आलेली उसाची कांडके आणि रस्त्यावर पडलेला ऊस यामुळे दुचाकीस्वारांचे होणारे अपघात गंभीर चिंतेचा विषय आहे.












































































