पै. भीमराव माने यांचा रयत क्रांतीत पक्षप्रवेश
सांगली । “संवादातून संघर्षाकडे” हे रयत क्रांती संघटनेचे ब्रिदवाक्य आहे. न्याय मिळत नसेल तर संघर्ष हा करावाच लागेल. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीने योग्य जागा न दिल्यास रयत क्रांती संघटना स्वबळावर निवडणुका लढेल, असे प्रतिपादन रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ. सदाभाऊ खोत यांनी केले.
कवठेपिरानचे माजी सरपंच व माजी जि.प.सदस्य पै. भीमराव माने यांच्या रयत क्रांती संघटनेच्या पक्षप्रवेश प्रसंगी ते इस्लामपूर बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सागर खोत, जिल्हाध्यक्ष विनायक जाधव, लालासाहेब पाटील, सुदर्शन पाटील, तालुकाध्यक्ष शशिकांत शेळके, शंभुराजे माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. खोत म्हणाले, रयत क्रांती संघटनेने उस, दूध दर वाढीसाठी तसेच कांद्याला योग्य दर मिळवण्यासाठी अनेक आंदोलने केली. सरकारचे चुकले तर त्यांच्या विरूध्द आवाज उठवला आहे.
ते म्हणाले, पै. भीमराव माने यांनी सरपंचपद तसेच जि.प.सदस्य म्हणून काम करताना महाराष्ट्रात नावलौकीक मिळवला आहे. त्यांचे संघटन पाहता रयत क्रांती संघटनेचा झेंडा महाराष्ट्रभर पोहचवावा.
पै. भीमराव माने म्हणाले, रयत क्रांती संघटनेची धुरा आ.सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. या माध्यमातून विविध प्रश्न हाती घेणार आहे. सदाभाऊ खोत हे स्वबळावर चळवळीच्या मुशीतून निर्माण झालेले नेतृत्व आहे. आमचे मित्रत्व अनेक वर्षापासून टिकून आहे. यापुढील काळात चळवळीच्या माध्यमातून समाजकार्य हाती घेवू.
यावेळी लालासो धुमाळ, प्रकाश कोळी, राकेश भोसले, चेतन चौगुले, डी.के.पाटील, प्रशांत पाटील, बजरंग भोसले, किरण उथळे, संदीप फार्णे, मोहसीन पटवेकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Recent Posts
बातमी शेअर करा : आषाढी एकादशीमुळे एसटीच्या तिजोरीत ३५ कोटी ८७ लाखांची भर मुंबई । आषाढी यात्रेनिमित्त ५२०० जादा बसेसच्या माध्यमातून एसटीने तब्बल ९ लाख ७१ हजार ६८३ भाविक – प्रवाशांची सुरक्षित ने-आण करून... Read more