सातारा | य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५- २६ च्या गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन उत्साहात संपन्न झाले. चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते यांत्रिक कळ दाबून रोलर बसविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला.
प्रारंभी व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांच्या हस्ते रोलरची पूजा करण्यात आली. त्यानंतर चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते यांत्रिक कळ दाबून रोलर बसविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. यावेळी संचालक दयानंद पाटील,धोंडीराम जाधव, निवासराव थोरात, संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, सयाजी यादव, जे डी मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, दीपक पाटील, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक माणिकराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना चेअरमन डॉ.सुरेश भोसले म्हणाले, साखर उद्योगात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. आपण त्यापध्दतीने बदल करत आहोत. कारखाना सध्या अत्याधुनिक केला आहे. या आधुनिकीकरणामुळे कृष्णा साखर कारखाना निश्चितच एक पाऊल पुढे टाकत आहे. आपण चांगले काम करून पुढील काही वर्षात कृष्णा कारखानाला देशात प्रथम क्रमांकाचा कारखाना बनवण्याचा प्रयत्न करूयात.
व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. संचालक बाबासो शिंदे यांनी आभार मानले. यावेळी जनरल मॅनेजर टेक्निकल बालाजी पबसेटवार, एम. के. कापूरकर, बाळासाहेब पाटील यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.