शेतकऱ्याकडे ॲग्रीस्टॅक नोंदणी असणे आवश्यक
सांगली | राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया सन 2025-26 अभियानांतर्गत खरीप हंगामामध्ये सांगली जिल्ह्यात सोयाबीन व भुईमूग या पिकांसाठी प्रमाणित बियाणे 100 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी शेतकऱ्याकडे ॲग्रीस्टॅक नोंदणी असणे आवश्यक आहे. या घटकाचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक लाभार्थींनी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbtmahait.gov.in farmer login या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
यामध्ये 0.20 हेक्टर ते जास्तीत जास्त 1 हेक्टर मर्यादेत बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याकरिता लाभार्थींची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून करण्यात येणार असून, त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी सदर बाबीच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. अधिक माहितीसाठी जिल्ह्यातील सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील सर्व शेतकऱ्यांनी नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
स्रोत : जि. मा. का., सांगली
Recent Posts
बातमी शेअर करा : गटविकास अधिकारी आर. बी. पांढरे यांची बदली सांगली । वाळवा पंचायत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर. बी. पांढरे यांची बदली झाली आहे. वाळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून डॉ. आबासाहेब प... Read more